Ajit Pawar Death in Plane Crash : पप्पा मी उद्या अजित दादांसोबत बारामतीला जाणारे… अपघातातील फ्लाईट अटेंडंटच्या वडिलांनी सांगितली शेवटची आठवण !
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीत अपघात होऊन ते क्रॅश झालं. यामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या विमानातील फ्लाईट अटेंडंड पिंकी माळी हिचाही मृत्यू झाली. तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं आज निधन झाला. बारामतीजवळ त्यांच्या विमानाचा अपघात होऊन स्फोट झाला. लँडिंग करत असतानाच विमान धाडकन खाली कोसळलं आणि मोठा स्फोट होऊन आगीच्या ज्वाळांनी वेढलं गेलं. त्यानंतर बराच काळ विमानात स्फोट होत होते. या विमानामध्ये अजित पवार यांच्यासह आणखी 4 जण होते. त्या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार यांच्या जाण्याने अख्खा महाराष्ट्र हादरला असून पवार कुटुंबावर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंतप्रधान मोदींपासून ते मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह यअनेकाींनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं. बारामतीकर तर शोकाकुल झाले असून अजित दादा गेले याच्यावर अजून कोणाचा विश्वासच बसत नाहीये.
या भीषण अपघातवेळी विमानात आणखी 5 जण होते, त्यामध्ये अजित पवार यांचे पीएसओ (PSO)विदिप जाधव, तसेच विमानाचे मुख्य कॅप्टन सुमित कपूर , को पायलट कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही समावेश होता. त्यांच्या सर्वांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
फ्लाइट अटेंडंटच्या वडिलांनी सांगितलं सगळं काही
या विमानात क्री मेंबर पिंका माळी होत्या, त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी, वडिलांनी मुलीशी कधी, काय बोलणं झालं, शेवटची भेट कधी झाली त्याबद्दल माहिती दिली. काल माझं तिच्याशी बोलणं झालं होती, मी उद्या अजित पवार यांच्यासोबत बारामतील जाणार आहे, तिथून मी नांदेडला जाणारे आहे, असं तिने मला सांगितलं होतं. मी ठीक आहे आणि आणप सकाळी बोलू असं तिला म्हणालो, अशी माहिती पिंकीच्या वडिलांनी दिली.
मला सकाळी फोन आला तेव्हा अपघाताबद्दल कळलं. ती गेल्या 5 वर्षांपासून प्रायव्हेट , चार्टर्ड फ्लाईटमध्येच असायची, क्रू मेंबर म्हणून काम करत होती. राष्ट्रपती , मुख्यमंत्री यांच्यासोबतच ती काम करायची. याच्याआधी तिने अनेक वेळा अजित पवार यांच्यासोबत फ्लाईट अटेंडंड म्हणून प्रवास केला आहे. ही तिची चौथी वेळ होती, अशी माहितीही वडिलांनी दिली.
तीच शेवटची भेट ठरली
पिकींची तुमची शेवटची भेट कधी झाली, असं त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. गेल्या वेळी मतदानासाठी ती ठाण्याहून इथे आली होती. तेव्हाच ती आम्हाला भेटली, तीच आमच्या लेकीची आमची शेवटची भेट ठरली असं सांगत तिच्या वडिलांनी अश्रू कसेबसे रोखून धरले.
सांभाळून कामावर जा लवकर घरी ये.. जाधव यांच्या आईने दिला होता निरोप
दरम्यान या अपघातात अजित पवार यांचे पीएसओ (PSO)विदिप जाधव यांचाही मृत्यू झाला. ते कळव्यातील रहिवासी होते. आज सकाळी कामासाठी ते बाहेर पडले,तीच त्यांच्या कुटुंबियाशी शेवटची भेट ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, जाधव हे कळवा विटावा सूर्यनगर ,शनिवार पार्क जवळ श्रीकृष्ण विहार खोली क्रमांक 9 येथे कुटुंबीयांपासून गेल्या 25 वर्षांपासून रहात होते. त्यांचे आई -वडील, पत्नी, मुलगा मुलगी असा त्यांचा परिवार होता. ते मुंबई पोलिस दलात ार्यरत होते आणि अजित पवार यांचे अंगरक्षक होते.
जाधव आज सकाळी 6 च्या सुमारास कामासाठी घराबाहेर पडले. तेव्हा त्यांच्या आईने त्यांना पाहिले. सांभाळून कामावर जा लवकर घरी ये असा निरोप त्यांच्या आईने लेकाला दिला होता. मात्र त्यानतंर जाधव परत आलेच नाहीत, विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी घरी थडकली आणि संपूर्ण कुटुंब दु:खात बुडालं.
