समर्थन केलं नाही हा खुलासा होत नाही, नामर्दपणा आहे…फडणविसांच्या प्रतिक्रियेवर राऊतांचा हल्लाबोल

| Updated on: Dec 03, 2022 | 1:33 PM

राज्यपाल यांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे संजय राऊत यांनी भाजपला कडाडून विरोध केला आहे. यामध्ये समर्थन केलं नाही असा खुलासा केल्याने राऊत यांनी फडणविसांना चांगलेच सुनावले आहे.

समर्थन केलं नाही हा खुलासा होत नाही, नामर्दपणा आहे...फडणविसांच्या प्रतिक्रियेवर राऊतांचा हल्लाबोल
Image Credit source: Google
Follow us on

शिर्डी : उदयनराजे ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाकडून अपमान झाला आहे, तरीही तो पक्ष अजूनही माफी मागायला तयार नाही. नूपुर शर्मा यांनी मागे विधान एक वादग्रस्त विधान केले होते, त्याला आम्ही विरोध केला होता, संपूर्ण देशात विरोध सुरू झाल्याने त्यांना पक्षातून काढून टाकले होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय प्रवक्ते त्रिवेदी यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यांच्याबद्दल भाजपने निषेध व्यक्त केला नाही. कॅबिनेटमध्ये निंदा प्रस्ताव यायला पाहिजे होता, त्यानंतर तो केंद्राकडे पाठवून त्यांना परव बोलवा म्हणून सांगायला पाहिजे होते. उलट फडणीवस यांनी आम्ही समर्थन केलं नाही असा खुलासा होत नाही. हा नामर्दपणा आहे. आणि तो खुलासा आमच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे, असं संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलत असतांना अवमान करणारी विधाने केल्याने अनेकदा त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यपाल यांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे संजय राऊत यांनी भाजपला कडाडून विरोध केला आहे. यामध्ये समर्थन केलं नाही असा खुलासा केल्याने राऊत यांनी फडणविसांना चांगलेच सुनावले आहे.

राज्यपाल यांच्याबाबत कॅबिनेटमध्ये निंदा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठवायला पाहिजे होते, मात्र ते या सरकारने केले नाही असंही राऊत यांनी म्हंटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले नाही असं म्हंटले असले तरी त्यांनी निषेध व्यक्त केला नाही, त्यांनी याबाबत खुलासा करणं म्हणजे नामर्दपणा असल्याचे म्हंटले आहे.

शिवरायांचा राज्यपाल यांनी अवमान केल्याप्रकरणी राजभवनाभावर जाऊन शिव्या द्या असंही शिंदे गटाच्या आमदारांना सल्ला देत, आम्हाला शिव्या देऊ नका त्यांना शिव्या देऊन दाखवा आम्ही फुलं उधळू असंही राऊत यांनी म्हंटले आहे.