ओमराजे निंबाळकर नामचीन गद्दार… संजय राऊत यांचे गंभीर आरोप, 15 कोटी रूपये..

ओमराजे निंबाळकर यांनी काल आपला निर्णय जाहीर करत शिवसेना शिंदे गटात जात असल्याचे स्पष्ट केले. यादम्यानच आता संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. हेच नाही तर यावेळी त्यांनी गद्दाराला भूमिका नसल्याचेही म्हटले.

ओमराजे निंबाळकर नामचीन गद्दार... संजय राऊत यांचे गंभीर आरोप, 15 कोटी रूपये..
Sanjay Raut and Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 22, 2026 | 11:14 AM

शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा होता. अखेर काल ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. धाराशिवमध्ये जाऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून अगोदर भावना जाणून घेतल्या, आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर केला. यादरम्यान शिवसेना नेते तानाजी सावंत हे ओमराजे निंबाळकर यांच्यासोबतच होते. शिवसेना ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्यात आली. ओमराजे निंबाळकर यांनी मातोश्रीबद्दल कोणीही बोलू नका, अशीही विनंती केली. ओमराजे निंबाळकर यांनी जरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरीही संजय राऊत यांच्याकडून ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली जात आहेत.

नुकताच संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, तुम्ही ज्या ओमराजे निंबाळकर यांचे नाव घेत आहात ते एक नामचिन गद्दार आहेत, त्यांच्यासोबतचे जे इतर गद्दार आहेत, ते देखील नामचिन गद्दार आहेत. गद्दाराला भूमिका असते हे मी आता ऐकले. इतिहासात जे गद्दार झाले, त्यांना काही भूमिका असू शकते का? नाही न.. जर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची जर कोणाला चिंता असेल तर या गद्दारांना गद्दारच म्हटले पाहिजे.

बैमान म्हटले पाहिजे… महाराष्ट्राचे शत्रू म्हटले पाहिजे. मराठी माणसाचे दुश्मन म्हटले पाहिजे. त्यांना कोणती भूमिका आहे, त्यातून तुम्ही सर्वांनी बाहेर पडले पाहिजे. शिवसेना तोडणे म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणे आहे. अमित शाह ते शिंदे गटाच्या माध्यमातून करत आहेत. आम्ही ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी अजिबात केली नाही. आम्ही त्यांना वस्तूस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्यांचे मित्र कैलास पाटील त्यांना भेटले, त्यांच्यासोबत वरूण सरदेसाई होते. शिंदे गटात गेल्यावर त्यांच्या वडिलांच्या आत्माला शांती मिळणार असेल ज्यांची 20 वर्षापूर्वी हत्या झाली, तर तो त्यांचा प्रश्न आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी ज्यांच्यावर आरोप केले. ते देखील त्याच युतीमध्ये आहेत ना.. आता मांडीला मांडी लावून बसतील. हा निर्लज्जपणाचा कळस आहे आणि स्वार्थाचा शिकर आहे. या लोकांनी ओमराजे निंबाळकर यांच्या वतीने कोणी पैसे घेतले… पहिले 15 कोटी ही सर्व माहिती उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. विकास, विकास, विकास आपण म्हणत आहात तर मराठवाड्याचा कोणता विकास भाजपाने केला? असाही प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Follow Us