AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! संजय राऊतांचे थेट देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण, नागपूरच्या…

संजय राऊत यांनी नुकताच मोठे विधान केले. त्यांनी रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण दिले. संजय राऊत उद्या नागपूर दाैऱ्यावर आहेत. आंदोलनाला परवानगी मिळाली नसल्याचे सांगताना फडणवीस दिसले.

मोठी बातमी! संजय राऊतांचे थेट देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण, नागपूरच्या...
Sanjay Raut
| Updated on: Jul 13, 2026 | 11:18 AM
Share

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकताच जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, देशामध्ये एवढ्या घडामोडी घडत आहेत, घडवल्या जात आहेत. सरकार निष्क्रिय आहे. त्यामुळे अनेक विषयांवर पक्षप्रमुखांनी बोलावे अशी आमची भूमिका आहे. आज दुपारी 12.30 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे. आज ते एका महत्वाच्या विषयावर बोलतील. रामाचे मालक कोण कधी पासून झाले. कुठल्याही मंदिराविषयी मी बोलत आहे. आम्ही अद्याप परवानगी मागितली नाही. मी उद्या नागपूरात जाईल. त्यानंतर या मंदिरासंदर्भातील जे काम आहे ते कुठे करायचे ते बघू. आम्ही राम रक्षा म्हणणार आहोत. आम्ही हनुमान चाळिसा म्हणणार आहोत. आता जर याच्यासाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर मग हे हिंदुत्वाचे मालक झाले आहेत का?

त्या ज्ञासाचे जरी देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असले तरीही ते अजीवन सदस्य आहेत तर आम्ही रामाचे अजीवन भक्त आहोत. ते सदस्य आहेत आणि आम्ही सगळे रामाचे अजीवन भक्त आहोत. त्यामुळे मला वाटत नाही की, यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होईल. नागपूरमध्ये अनेक राम मंदिरे आहेत किंवा या प्रकारच्या अनेक धार्मिक संस्था आहेत.

आम्हाला फक्त लोकांच्या मनात जागृतता आणायची आहे की, या देशात रामाच्या नावावर काय गोष्टी घडत आहेत. आम्ही जे करतोय आहोत, त्याला खरे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीही पाठिंबा दिला पाहिजे. कारण जे अजीवन सदस्य आहेत ना..? ते कारसेवेला केले होते, असे ते म्हणत आहेत. ज्या राम मंदिराच्या कारसेवेला ते केले होते, ते जर राम मंदिर लुटले

जात असेल तर मग देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांनी निर्माण केलेले राम मंदिरे असतील त्या सर्व पुजाऱ्यांनी किंवा भक्तांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे. देवेंद्र फडणवीसांना खुले निमंत्रणच देत आहे. ते जर अजीवन सदस्य असतील तर त्यांनी आमच्या राम रक्षा आंदोलनात सहभागी व्हावे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Follow Us
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....