राज्याला खरंच नवा मुख्यमंत्री मिळणार? बावनकुळेंनी थेट सांगूनच टाकलं, म्हणाले फडणवीस…

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी मोठं विधान केलं होतं. त्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

राज्याला खरंच नवा मुख्यमंत्री मिळणार? बावनकुळेंनी थेट सांगूनच टाकलं, म्हणाले फडणवीस...
Chandrashekhar Bawankule
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 11, 2026 | 8:19 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सध्या वेगवेगळे दावे केले जात आहेत. मध्यतंरी तर देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असून, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे. संजय राऊत यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे लवकरच केंद्रात मंत्री होऊ शकता असं बोललं जात आहे, जर तसं झालं तर चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, असं भाकीत राऊत यांनी वर्तवलं आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या या विधानावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले बावनकुळे? 

‘सध्या अफवांचा बाजार गरम आहे. यातीलच अफवा आज पेरली गेली. त्याला बिनबुडाचे आकलन, म्हणावे लागेल. सूर्यप्रकाशाइतके एक सत्य आहे. महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन मा. श्री. देवेंद्र फडणवीस जीच २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहावेत, ही महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची भावना आहे. विकसित महाराष्ट्राची हीच गरज आहे. मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये. असं ट्विट बावनकुळे यांनी केलं आहे.

 

संजय राऊत नेमकं काय म्हणाले? 

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदावरून राज्यात सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री होणार अशी चर्चा आहे, जर तसं झालं तर चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होऊ शकतात. एकनाथ शिंदे यांना आता पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार नाही, तसेच गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड खूप खराब आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.  त्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Follow Us