
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्येत बरी नसल्याने गेल्या महिन्याभरापासून ते सक्रिय दिसत नव्हते.खराब प्रकृतीमुळे संजय राऊत हे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. मात्र आज बऱ्याच दिवसांनी ते माध्यमांच्या समोर आले आणि नेहमीप्रमाणे त्यांची तोप धडाडली. प्रकृतीबाबात, आजारपण, उपाचारांबाबात माहिती देतानाच त्यांनी शिंदे गट, भाजप, एकंदर राजकारण यावरही सविस्तर प्रतिक्रिया देत टीकास्त्रही सोडलं.
‘ माझ्यावर अद्याप उपचार सुरू आहेत आणि माझी तब्येत सुधारते आहे. पूर्ण सुधारायला अजून थोडा वेळ लागेल. 1 महिन्यापेक्षा जास्त काळ मी घरच्या आणि हॉस्पिटलच्या कैदखान्यात आहे. मा. उद्धव ठाकरे यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे, मी कुठे बाहरे पडतोय का हे पहात आहेत ते. आताही त्यांची परवानगी नाही. पण तरीही आपण सगळे आलात, बऱ्या दिवसांनी आपण भेटत आहोत. तब्येतीत थोडी सुधारण होत आहे, यापुढे अजून होईल. उपचार फार कठोर असतात, आजारापेक्षा उपचार भयंकर असतात. पण ते चालू आहेत, मला खात्री आहे की डिसेंबरनंतर मी पूर्णपणे बरा होईन येईन’, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
‘डॉक्टरांना पूर्ण विश्वास आहे. प्रमुख डॉक्टर उपचार करत आहेत. रेडिएशनचा मुख्य भाग संपलेला आहे, इतर काही उपचार सुरू आहेत. चांगल्या प्रकारे रिकव्हरी सुरू आहे, पण माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही. जर बरा असतो तर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रात 100 टक्के फिरलो असतो’, असंही राऊत म्हणाले.
गुलाबो गँगने सांगितलं आज लक्ष्मीदर्शन होणार – शिंदे गटावर टीकास्त्र
उद्या निवडणुका होत आहेत आणि शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलं की आज (1 तारखेला) लक्ष्मी दर्शन होणार आहे. ते आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. राज्याच्या मंत्र्यांनी जाहीर केलं होतं की 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार, त्यामुळे सकाळपासून लोकं जागेच आहेत. काही ठिकाणी मतामागे 10 हजार, 15 हजार असं लक्ष्मी दर्शन होत आहे. ही नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या प्रकारे सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत नगर पालिका नगर पंचायत निवडणुकीत पैशाचा इतका खेळ झाला नव्हता.
मुळात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार लढवतच नव्हते, ते स्थानिक पातळीवरच लोकं लढत होते. पण आता 5 6 हेलिकॉप्टर, खाजगी विमान वापरली आहेत. नगरपालिकेसाठी सत्तेतल्या 3 पक्षातील स्पर्धा आहे अशा शब्दांत राऊतांनी हल्ला चढवला.
शिंदे सेनेचा कोथळा अमित शाहाच काढणार
इतके कोट्यावढी रुपये खर्च करून कोणासाठी लढताय. आपापसात मारामाऱ्या सोडा. 3 पक्षातील स्पर्धा आहे. शिंदे यांची शिवसेना म्हणायला तयार नाही. मुळात शिंदे यांची जी सेना आहे, त्यांचा कोथळा अमित शाह हेच काढणार आहेत, हे वाक्यच लिहून ठेवा. जसं त्यांनी आमचा काढायचा प्रयत्न केला होता. शिंदेंचे 35 आमदार फुटणार. रवींद्र चव्हाण हे bjp चे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांची नेमणूक त्यासाठीच केली आहे. त्यांना वाटतं दिल्लीचे 2 नेते आमच्या पाठीशी पण ते कोणाचेच नाहीत.
शिंदे यांचा पक्ष फुटलेला आहे, अमित शाहांनी निर्माण केलेला गट आहे. या लोकांनी कधी शिवसेने साठी खस्ता खाल्ल्यात. पैशाच्या ताकदीवर निवडणुका लढणे म्हणजेच लोकशाही नाही अशा शब्दांत राऊतांनी टीका केली.