पक्ष कसा फुटतो, हे अमित शहांना कळणार, आता दयामया नाही; संजय राऊतांचं ओपन चँलेज
संजय राऊत यांनी पुन्हा सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. सत्ता आल्यावर भाजपही पक्ष फोडणार असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

6 खासदार फुटल्याची जखम ठाकरे गटावर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर संजय राऊत यांनी पुन्हा जहरी टीका केली आहे. आमची सत्ता आल्यावर पक्ष कसे फुटतात, हे आम्ही दाखवून देऊ. तेव्हाच अमित शहांना कळणार. आता मुळीच दयामया नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला ओपन चँलेच दिले आहे. संजय राऊत यांच्या चँलेजने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत म्हणाले, ‘अमित शहा-नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा पक्ष फोडला. त्यांनी आमचा पक्ष फोडला. आम्ही त्यांना भेटणार नाही. आमचा वाद कायम राहील. नुसता पक्ष फोडला नाही. तर ऐऱ्यागैऱ्याच्या हातात दिला. हा शब्द मुद्दाम वापरतोय. कारण त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही. आमची सत्ता आल्यावर अमित शहा यांच्या मुलाच्या ताब्यातील क्रिकेट कंट्रोल बोर्डावरून त्यांना काढू. दुसऱ्याच्या हातात देऊ. क्रिकेट पक्ष हा राजकीय पक्ष नाही’.
‘शिवसेना किंवा शरद पवारांचा पक्ष असो…. त्यांनी निर्घृण, अमानुष राजकारण केलं. त्यामुळे त्यांना माफी नाही. आमच्याकडे सत्ता येईल, तेव्हा कळेल. शरद पवार हे एनडीए सोबत जाणार नाही. आमचा स्वाभिमान वेगळ्या प्रकारचा आहे. आम्ही त्यांचं तोंड देखील बघणार नाही. शरद पवारांचं राजकारण सर्वसमावेशक आहे. आमचं तसं नाही. आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आमचा पक्ष फोडला. चिन्ह गेलं. ऐऱ्यागैऱ्याच्या हातात दिला. आमची लढाई सुरू राहणार आहे, अशा शब्दात राऊतांनी टीका केली.
‘आमची सत्ता आल्यावर पक्ष कसे फुटतात, हे अमित शहा आणि भाजपला कळेल. हातात सत्तेत आल्यावर पक्ष कसे फुटतात, हे निर्घृणपणे दाखवून देऊल. आमचं ठरलं आहे. दयामया नाही. फोडोफोडी त्यांनी नव्या लोकशाहीत बसवली आहे. आम्हीही तसंच करणार. आम्ही काय षंढ-नामर्द आहोत का? नार्मद आहोत का?
ज्या दिवशी सत्ता जाईल, भाजप रिकामी होईल. सत्ता काय करू शकते, तेव्हा कळेल. माचीसच्या बॉक्ससारखा भाजप रिकामा होईल, असं चॅलेंज संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं.