Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!

व्हिडीओत दिसणाऱ्या या महिलेचे संजय राऊतांनी कौतुक केले आहे. 'जय महाराष्ट्र ,मुली! शोभतेस महाराष्ट्र कन्या,' असं संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!
mumbai dadar protest women video viral
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 20, 2026 | 10:00 PM

Mumbai Protest : सध्या राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची चर्चा आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. दिल्लीमध्ये हजारो तरुण-तरुणी जमले आहेत. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलक मागणी करत आहेत. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर आंदोलन केले जात आहे. हीच बाब लक्षात घेता राज्यभरातील पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे. दरम्यान, पोलिसांचा बंदोबस्त असताना एका महिलेला संताप अनावर झाला आहे. या महिलेने पोलिसांना चांगलेच सुनावले आहे. खासदार संजय राऊत यांनी या महिलेचा व्हिडीओ अपलोड केला असून महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

पोलिसांमुळे महिलेचा चढला पारा

राऊतांनी त्यांच्या सोशल मीडियाव खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला एका लहान मुलाला घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. अगोदर पोलिसांनी त्या महिलेला त्या जागेवर उभे राहू नका, असे सांगितले. त्यानंतर या महिलेचा पारा चढला आहे. आम्हाला तुमच्यापासून संरक्षण नको आहे. आम्हाला तुमच्यापासूनच संरक्षण पाहिजे, असं म्हणत पोलिसांनाच सुनावलं आहे.

राऊतांनी केलं महिलेचं कौतुक

व्हिडीओत दिसणाऱ्या या महिलेचे संजय राऊतांनी कौतुक केले आहे. ‘जय महाराष्ट्र ,मुली! शोभतेस महाराष्ट्र कन्या,’ असं संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. तसेच या मुलीने जो संताप व्यक्त केलाय. तोच संताप हे भ्रष्ट सरकार जाळून टाकेल, असा हल्लाबोलही राऊतांनी केलाय. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन सुरू होते. याच आंदोलनादरम्यान या महिलेचा हा संताप पाहायला मिळाला.

महिला काय म्हणाली?

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेने पोलिसांना चांगलेच सुनावले आहे. मी घोषणा दिल्या नाही. गाणं म्हटलेलं नाही. तरी इथून जा असं सांगितलं आहे. इथं उभं राहायचं नाही असं सांगितलं जातंय. आम्हाला मुख्यमंत्री, पंतप्रधानांपासून संरक्षण द्या, असं संताप या महिलेने व्यक्त केला. तसेच आम्ही तुमच्याकडे जेव्हा संरक्षण मागायला येतो तेव्हा चार-चार तास बसवून ठेवता. आता आम्ही आमच्या हक्कांसाठी उभे राहिलो आहोत, तर आम्हाला संरक्षण देताय. आम्हाला तुमचे संरक्षण नको आहे, असंही या महिलेने पोलिसांना ठणकावून सांगितले आहे.

Follow Us