मोठी घडामोड! संजय राऊतांकडून पहिल्यांदाच शिंदेंच्या मंत्र्याचं कौतुक; मनातलं सगळं सांगून टाकलं

खासदार संजय राऊतांकडून पहिल्यांदाच शिंदेंच्या मंत्र्याचं कौतुक करण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी मनातलं सगळं सांगितलं. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मोठी घडामोड! संजय राऊतांकडून पहिल्यांदाच शिंदेंच्या मंत्र्याचं कौतुक; मनातलं सगळं सांगून टाकलं
raut on sarnaik
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 10, 2026 | 11:01 AM

राज्यात रिक्षाचालकांकडून रॅपिडो बाईक-टॅक्सीचा विरोध केला जात आहे. रॅपिडो बाईक-टॅक्सीमुळे हजारो रिक्षाचालकांच्या पोटापाण्यावर संकट येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या रॅपिडोमुळे आमच्या रोजीरोटीवर संकट येत असल्याचा दावा रिक्षाचालकांच्या संघटनांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांचे कौतुक केलं.

संजय राऊत म्हणाले, मला नक्की जायला आवडलं असतं. थोडं बोलणं व्यवस्थित झालं नाही. राज्याचे प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, तो कौतुकास्पद आहे. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. हजारो रिक्षा चालक हे राज्याच्या मंत्र्यांकडे जातात. तेव्हा सहानभुतीने विचार केला पाहिजे. यापूर्वी रिक्षाचालकांना वाली नव्हता. ते राज्याचे परिवहन मंत्री आहेत. त्यांचे प्रश्न समजून घेतले. राजकीय भांडणे करत राहू. परंतु परिवहन मंत्री म्हणून त्यांनी रिक्षा चालकांचं म्हणणं ऐकून घेतलं. या रिक्षाचालकांचं शिष्टमंडळ नंतर मला भेटायला आलं’.

‘परिवहन मंत्र्‍याने उत्तम काम केलं. त्यांनी संवाद साधला. त्यांनी रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. हे रिक्षाचालक महाराष्ट्रातील हजारो रिक्षाचालकांचं प्रतिनिधीत्व करत होते. तो प्रश्न याच व्यासपीठावरून मांडला. तो मांडताना परिवहन मंत्र्‍यांना कडक शब्द वापरले होते. गरीबांचं म्हणणं ऐकत नाही, असं म्हटलं होतं. तुम्ही रिक्षाचालकांना भेटत नाही, असं म्हटलं. त्यांनी त्याची दखल घेतली. त्यानंतर त्यावर चर्चा केली. नंतर मार्ग काढला. रॅपिडो बाईक-टॅक्सी यामुळे हजारो रिक्षाचालकांवर आलेलं संकट आहे. हे संकट दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. मुख्यमंत्री, परिवहन मंत्री राज्याचे आहेत. आम्ही जाणार कोणाकडे…, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

‘मी भविष्यात मंत्री परिवहन मंत्र्‍यांना नक्की भेटणार. मी रिक्षाचालकांना म्हटलं की, तुम्ही भेटलात. एक संवाद सुरू झाला. हे योग्य आहे. त्यांचं म्हणणं होतं की, मी जात नसेल, ते जाणार नव्हते. त्यांना आदर मिळावा, अशी त्यांची मागणी होती. मी म्हटलं, असं होत नाही. तुम्हाला बोलावलं असेल, तर त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. असं बहिष्कार टाकून चालत नाही. ते मंत्री आहेत. सरकार आहे. त्यांच्याशी बोला. त्यांचे बरेचशे प्रश्न मंत्री सरनाईक आणि परिवहन आयुक्तांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाचं समाधानही झालं. मी त्यांना सांगितलं की, अडचण झाल्यास नंतर मी नेतृत्व करेल, असे राऊतांनी पुढे सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us