Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांच्या निशाण्यावर राज्य सरकार? MPSC प्रकरणात केली मोठी घोषणा
Abhijeet Dipke on MPSC Paper Leak: एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपर फुटीवरून राज्यात रान उठले आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येत आक्रमक भूमिका मांडली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सुद्धा राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गलथान कारभाराविरोधात राज्यातील मोठ्या शहरात परीक्षार्थी उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत. सीबीडी बेलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. काही राजकीय पक्षही मैदानात उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांनी लढा पुकारला आहे. आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके विद्यार्थी आंदोलनात उतरणार आहेत. त्यांनी याप्रकरणी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे.
प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबाची घेणार भेट
दीपके यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यानुसार, एमपीएससीचा विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने टोकाचे पाऊल उचलल्यानंतर त्याच्या कुटुंबाची भेट घेणार आहे. तर दुसरीकडे सीजेपीचे वरिष्ठ नेते सौरभ दास हे सुद्धा नोएडा येथे पोहचतील. प्रशासनाकडे अक्षत नावाच्या विद्यार्थ्याला पाच लाखांची नोटीस बजावण्यात आली. त्याला ते भेटणार आहेत.
पोलीस उपायुक्त कृषिकेश रावळे यांनी पीटीआयला माहिती दिली. त्यानुसार प्रथमेश देशमुख हा एमपीएससीची तयारी करत होता. पुण्यातील नवी पेठ भागातील एका खोलीत तो किरायाने राहत होता. त्याने फाशी घेत आत्महत्या केली. याविषयीची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एमपीएससीविरोधात आंदोलन तीव्र केले आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय?
1.एमपीएससीविरोधात आंदोलन करणऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. त्यात विविध स्पर्धा परीक्षांच्या जाहिरातींमध्ये जागांची संख्या कमी असल्याचे कारण देत पद संख्येत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
2.परीक्षा होऊन अनेक महिने उलटले तरीही निकाल रखडलेले आहेत. काहींच्या मुलाखती झालेल्या नाहीत. काहींना नियुक्ती देण्यात आलेली नाही. ही प्रक्रिया झटपट पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
3.परीक्षेचे वेळापत्रक, प्रश्नपत्रिका फूट , उत्तर तालिकेतील त्रुटी आणि सतत बदलणारे वेळापत्रक यामुळे विद्यार्थी मेटाकुटीला आलेले आहेत. यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
अभिजीत दिपके यांचा काय इशारा?
अभिजीत दिपके यांनी सरकाराला मोठा इशारा दिला आहे. MPSC आणि राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची तातडीने दखल घ्यावी. अन्यथा पुण्यासह राज्यभरात जोरदार निदर्शने करण्याचा इशारा दिपके यांच्या सीजेपीने दिला आहे.
