देवेंद्र फडणवीसांच्या चिनी फंडिंगच्या आरोपावरून संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, तुम्हाला कोण…’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या चिनी फंडिंगच्या आरोपांना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनीही फडणवीसांनी फंडिंगवरून उलट सवाल केला.

देवेंद्र फडणवीसांच्या चिनी फंडिंगच्या आरोपावरून संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, तुम्हाला कोण...’
sanjay raut on devendra fadnavis news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 02, 2026 | 11:29 AM

ठाण्यातील लोकशाही बचाव रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राहुल गांधींना चिनी फंडिंग मिळत असल्याचा आरोप केला. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चीनच्या फंडिंगच्या गोष्टी सोडा. अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये चिनी घुसलेत, त्याकडे लक्ष द्या…असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला.

संजय राऊतांनी फडणवीसांना काय म्हटलं?

Loading...

संजय राऊत म्हणाले, ‘चीनच्या फंडिंगचं नंतर बघू…आधी अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये चीन घुसलं आहे. लडाख, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयच्या बाजूला चीन घुसू पाहतंय. नेपाळमध्ये चीन घुसलं आहे. तुम्हाला कोण फंडिंग करतंय, ते बघा आधी. चीन घुसलं,त्यावर बोलत नाही. फंडिंगच्या गोष्टी करत आहेत. मूर्ख आहेत’.

…तर भाजपने शिवसेना फोडली नसती 

इंडिया आघाडीच्या रॅलीत महाराष्ट्रातील नेत्यांना भाषणांची संधी मिळाली नाही, भाजपच्या टीकेवर संजय राऊत म्हणाले, ‘सकाळी आठ वाजल्यांपासून रामलीला मैदानात बसले होते. भाषण लांबत गेली. गर्दी वाढत गेली. गर्दीचा रेटा स्टेजपर्यंत पोहोचू लागला. लाइटचं कनेक्शन तुटत होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी लवकर भाषण संपवणे गरजेचे होते. भाजपने महाराष्ट्राची चिंता करू नये. भाजपने महाराष्ट्राची चिंता केली असती तर शिवसेना फोडली नसती’.

भाजपच्या रॅलीवर खासदार संजय राऊत म्हणाले, प्रतिरॅली, प्रतिबिंब पडत असतात. मोदींच्या विरोधात लाट उसळली आहे. आता आंधळ्यांच्या रॅली सुरू आहेत. त्यांना ऐकायला येत नाहीत. त्यांना दिसत आहे. बाहेर काय चालू आहे, हे कळत नाही.  मोदी कुठेही जाणार नाही, अशा घोषणा देत आहेत. कुठून घोषणा सुचतात, काय माहीत. झोपेच्या गोळ्या घेतात. सकाळी उठतात. नवीन घोषणा देतात. राहुल गांधी म्हणाले की, मोदी कुठेही जाणार नाही, हे बरोबर बोलले. मोदी इथेच राहतील. आम्ही कुठे जाऊ देणार नाही. त्यांना कुठे पळून जाऊ देणार नाही. इथेच राहतील. त्यांच्यावर खटले चालतील. मोदी आणि त्यांची कंपनी तुरुंगात जाईल’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us