Sanjay Raut : बाळासाहेबांचा फोटो फाडताच संजय राऊतांचा संताप, शिंदे गटाला दोन शब्दांत जागा दाखवली!

संजय राऊत यांनी शिंदे गटावर दोन शब्दांत जहरी टीका केली. 'बकवास लेकाचे' असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटाला सुनावलंय.

Sanjay Raut : बाळासाहेबांचा फोटो फाडताच संजय राऊतांचा संताप, शिंदे गटाला दोन शब्दांत जागा दाखवली!
eknath shinde and sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 3:52 PM

Sanjay Raut : शिंदे गटातील नेत्या शायना एनसी यांनी दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याने नवा वाद निर्माण झालाय. शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी ‘बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाची काही पाने फाडली. याच वेळी शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोट फाडला. त्यांच्या या कृतीनंतर आता ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. सोनिया गांधी यांचे पुस्तक फाडल्याने काँग्रेसनेही शिंदे गटावर सडकून टीका केलीय. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अवघ्या दोन बोचऱ्या शब्दांत शिंदे गटाला सुनावलं आहे.

संजय राऊतांचं दोन शब्दांत ट्वीट

शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्यानंतर काँग्रेसचे पनेते अतुल लोंढे यांनी ट्वीट करत शिंदे गटावर टीका केली. आपल्या ट्वीटमध्ये ‘शिंदेंच्या नेत्यांनी अनावधानाने नाही जाणिवपूर्वक बाळासाहेबांचा फोटो फाडला आहे. हीच भाजप RSS ची विषवल्ली बाळासाहेबांच्या खांद्यावर चढून महाराष्ट्रात सत्तेवर आली आणि संधी भेटताच बाळासाहेबांची शिवसेना फोडून ती संपवण्याचे षडयंत्र केले,’ असा हल्लाबोल अतुल लोंढे यांनी केला. तसेच गद्दारसेनेचा निषेध असो, असेही ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले. अतुल लोंढे यांचेच ट्वीट रिट्विट करून संजय राऊत यांनी शिंदे गटावर दोन शब्दांत जहरी टीका केली. ‘बकवास लेकाचे’ असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटाला सुनावलंय.

Loading...

मुंबई महापालिकेत पडसाद उमटले

दरम्यान, शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्यानंतर त्याचे पडसाद मुंबई महापालिकेतही उमटले. ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही शिंदे गटावर टीका केली. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही शायना एनसी यांनी केलेल्या कृतीचा निषेध करत आपला आक्षेप नोंदवला. शायना एनसी यांनी केलेली कृती ही संतापजनक आहे. ज्या बाळासाहेबांमुळे ते मोठे झाले, आज त्यांचाच फोटो फाडून टाकला जातोय, हे चुकीच आहे, असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं. दरम्यान, आता शायना एनसी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होणार आहे. त्यामुळे यावर शायना एनसी नेमकं काय स्पष्टीकरण देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us