या माणसाला समर्थन देत आहात? त्यापेक्षा राजकारण सोडलेलं बरं, संजय राऊत यांनी अमित शाह यांचा तो व्हिडिओ पोस्ट करत केला वार

डिलिमिटेशन विधेयकावरुन राष्ट्रवादीने पाठींबा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत शरद पवार यांच्या दुसऱ्या फळींच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे.

या माणसाला समर्थन देत आहात? त्यापेक्षा राजकारण सोडलेलं बरं, संजय राऊत यांनी अमित शाह यांचा तो व्हिडिओ पोस्ट करत केला वार
| Updated on: Nov 28, 2026 | 11:29 PM

डिलिमिटेशन विधेयकावरुन राष्ट्रवादीने पाठींबा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. अमित शाह यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ असून त्यांनी या पोस्टमध्ये या माणसाला समर्थन देत आहात? त्यापेक्षा राजकारण सोडलेलं बरं, असा सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नेत्यांच्या फळीला टॅग केले आहे.

पोस्ट वाचा –

Loading...

राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार ८५ वर्षांचे असून ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, त्यांच्या उर्वरित नेत्यांनी गेले काही दिवस विलिनीकरणाचे दावे-प्रतिदावे करत महाराष्ट्रात गोंधळ घातला होता. शरद पवार हे रुग्णालयात दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना तुम्ही आराम करा, सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळतो अशा शुभेच्छा दिल्या तेव्हा राजकारणात काही तरी वेगळे शिजतंय हे स्पष्ट झाले होते. अखेर नाही..हो करत सुप्रिया सुळे यांनी जर पन्नास टक्के जागा वाढणार असतील तर काय हरकत आहे असा उपप्रश्न करत आपल्या मनातील गोष्ठ बोलून दाखविली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी थेट राष्ट्रवादीचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठींबा असल्याचे जाहीर करुन टाकले. त्यानंतर पुन्हा सुप्रिया सुळे यांनी आम्ही टेबलवर विधेयक येईल तेव्हा त्याचा मसुदा वाचून निर्णय घेऊ असा पवित्रा घेतला. मात्र, राष्ट्रवादी ही एनडीएच्या समर्थनार्थ उतरली आहे हे एव्हाना स्पष्ट झाले होते.

आज खासदार संजय राऊत यांनी ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर कठोर टीका केली आहे. तुम्ही महाराष्ट्र द्रोह करणाऱ्यांच्या बाजूने कसे काय उभे राहणार आहात असा सवालच केला. संजय राऊत यांनी शनिवारी रात्री गृहमंत्री अमित शाह यांचा एका व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओ अमित शाह राष्ट्रवादीला दुगाण्या झाडताना दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us