आघाडीची ऑफर हे तर ‘जलील’ षडयंत्र; Sanjay Raut यांची खोचक टीका

| Updated on: Mar 20, 2022 | 11:11 AM

एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याच्या दिलेल्या प्रस्तावावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा टीका केली आहे. कालच हा मुद्दा संपला आहे. ही ऑफर म्हणजे एक राजकीय षडयंत्रं होतं. आम्हाला बदनाम करण्याचं ते एक जलील षडयंत्र होतं.

आघाडीची ऑफर हे तर जलील षडयंत्र; Sanjay Raut यांची खोचक टीका
आघाडीची ऑफर हे तर जलील षडयंत्र; Sanjay Raut यांची खोचक टीका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: एमआयएमने (mim) महाविकास आघाडीत (maha vikas aghadi) येण्याच्या दिलेल्या प्रस्तावावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज पुन्हा एकदा टीका केली आहे. कालच हा मुद्दा संपला आहे. ही ऑफर म्हणजे एक राजकीय षडयंत्रं होतं. आम्हाला बदनाम करण्याचं ते एक जलील षडयंत्र होतं. आमच्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचं षडयंत्र होतं. पण अशाप्रकारची कोणतीही आघाडी होणार नाही असं आम्ही स्पष्ट केलं आहे. भविष्यातही अशा प्रकारचं अलायन्स होणार नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत एमआयएमला सामिल करून घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करताना जलील यांनी हा प्रस्ताव ठेवला. त्यावरून आघाडीत गदारोळ उडाला आहे. आघाडीच्या सर्वच नेत्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. शिवसेनेनेही एमआयएमला आघाडीत घेण्यास तीव्र विरोध केला होता.

जपानने भारतात 3 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचं संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. मोदींच्या नेतृत्वात गुंतवणूक होत असेल तर स्वागत केलं पाहिजे. ही गुंतवणूक देशासाठी येणार आहे. जपान जर गुंतवणूक करत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. पंतप्रधान देशाचे आहेत. ते एका पक्षाचे किंवा राज्याचे नाहीत. ही गुंतवणूक कुठे जाणार आहे, कोणत्या राज्यात जाणार आहे. एखाद्या राज्यात जाणार की देशभरात जाणार याबाबत नंतर पाहू, असं संजय राऊत म्हणाले.

हिंदुत्वादी शिवसेनेला कुणी दगा दिला?

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार श्वेता महाले यांनी शिवसेनेवर टीका केली होती. राऊत यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना कधी हिंदुत्व विसरली नाही. विसरणार नाही. हिंदुत्व नक्की कोण विसरलं याचं चिंतन भाजपने करावं. हिंदुत्ववादी शिवसेनेला दगा कुणी दिला याचं चिंतन त्यानी करावं. आम्ही हिंदुत्वाशी पक्के आहोत. आमची नाळ हिंदुत्वाशी पक्की आहे. गरज पडेल तेव्हा आम्ही हिंदुत्वासाठी हातात तलवार घ्यायला तयार आहोत, असा पलटवार राऊत यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

Khadse Patil clash: खडसेंनी पथ्य पाळावीत, चंद्रकांत पाटलांचा इशारा, MVA च्या नेत्यांच्या कृत्यामुळे जनतेची झोप उडाल्याचाही दावा

पाकव्याप्त Kashmir भारताला कधी जोडणार?; संजय राऊतांचा भाजपला सवाल

विदर्भातील रस्त्यांसाठी 831 कोटींची कामे मंजूर, केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांची घोषणा