लोक त्यांना बाXX म्हणतात, गिरीश महाजनांवर बोलताना राऊतांची जीभ घसरली, वादग्रस्त वक्तव्य
शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार कसे फुटले? असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या टीकेचा जोरदार समचार घेतला आहे. तसेच गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना राऊत यांची जीभ घसरल्याचं पहायला मिळालं. एक मंत्री आहेत, त्यांना लोकं बायले म्हणतात, गिरीश महाजन असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत
संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक मंत्री आहेत, लोकं त्यांना बायले म्हणतात, गिरीश महाजन. असं राऊत यांनी म्हटलं आहे. गद्दारांशी नाही लडायचं तर कोणाशी लढायचं? गद्दारांना कोणती भाषा वापरायची हे गिरीश महाजनांनी सांगावं. राडे करणार की नाही हे कोण ठरवणार? गिरीश महाजन पोलिसांच्या गाड्या बाजूला ठेवून या, आमच्याकडे राडे करण्याची क्षमता नाही, मग त्यांना वाय प्लस, सीआरपीएफची सेक्युरिटी, घरावर, मालमत्तेवर सुरक्षा का दिली? प्रत्येक गद्दारांना सेक्युरिटी देण्याचं कारण काय? तुम्ही सेक्युरिटी काढा, तुमच्या अंगावर चिंधी राहणार नाही. तुमचा बॉस शिंदे हे सुरक्षा घेऊन फिरत आहेत. त्यांच्या चिरंजीवांकडे देखील सुरक्षा आहे. मला त्यात पडायचं नाही, पण मग त्यांना सुरक्षा का दिली? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
खाकी वर्दीची, ईडीची, सीबीआयची मस्ती दाखवत आहात, गिरीश महाजन म्हणाले कसे फुटले? माझ्याकडे एक दिवस सीबीआय ईडी आली तर सर्वात आधी गिरीश महाजन यांना फोडून नाही दाखवलं तर बघा. अर्धा तास ईडी सीबीआय माझ्याकडे द्या, गिरीश महाजन यांना फोडतो. हा माणूस काय शिकवतो? कुंभमेळ्याचे कंत्राट कुणाला दिले? माझ्याकडे यादी आहे, असं यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे.