संतोष देशमुखांची क्रूर हत्या ते धनंजय मुंडेंचा राजीनामा, आतापर्यंत काय काय घडलं? A टू Z अपडेट

संतोष देशमुख हत्या प्रकरणात क्रूरपणे मारहाण करतानाचे व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी अनेकांना अटक झाली असून मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. हा संपूर्ण घटनाक्रम, आरोपी, पुरावे आणि राजकीय आरोप प्रत्यारोपाची माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुखांची क्रूर हत्या ते धनंजय मुंडेंचा राजीनामा, आतापर्यंत काय काय घडलं? A टू Z अपडेट
santosh deshmukh dhananjay munde
| Updated on: Mar 04, 2025 | 2:58 PM

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे. संतोष देशमुख यांची हत्या करताना, त्यांना क्रूरपणे मारहाण करतानाचे अनेक व्हिडीओ, फोटो समोर आले. या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. या हत्येच्या कटात सहभाग असलेले विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहे. संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करतानाचे व्हिडीओ समोर आल्यानतंर आता धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. यामुळे आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येईल, असे म्हटले जात आहे. संतोष देशमुखांच्या हत्येपासून आतापर्यंत काय काय घडलं, याबद्दल आपण जाणून घेऊया संतोष देशमुख हत्या प्रकरणाची A टू Z अपडेट 💠28 मे 2024 – पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले. त्या बदल्यात 2 कोटी रुपयांची खंडणी द्या, अशी मागणी करण्यात आली. जर...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा