सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक, मंत्री जयकुमार गोरे यांना भावाचेच आव्हान
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर त्यांचेच बंधू शेखर गोरे यांचे मोठे आव्हान पाहायला मिळत आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांना त्यांचे बंधू बँकेचे संचालक शेखर गोरे यांनीच मोठे आव्हान दिल्याने ही निवडणूक चर्चेत आली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्षाच्या चर्चेतून फॉर्म्युला ठरला असला तरी माण तालुक्यात भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर त्यांचे बंधू एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते बँकेचे माजी संचालक शेखर गोरे यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे.
आरबीआयच्या 10 वर्षाच्या संचालक पदाच्या निकषामुळे अनेक दिग्गजांना जिल्हा बँकेतून माघार घ्यावी लागली.यामुळे अनेक दिग्गज नेत्यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत एट्री झाली आहे. सध्या जिल्हा बँकेच्या 21 जागांपैकी 9 जागा बिनविरोध झाल्या तर 12 जागांवर महत्त्वाच्या लढती पाहायला मिळत आहेत. यामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर त्यांचेच बंधू शेखर गोरे यांचे मोठे आव्हान पाहायला मिळत आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गोरे बंधूंत होणाऱ्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत काय होते ? याकडे पाहिले जात असून नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे भाजपाचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते यांच्यातील ही लढत महायुतीत नेमके काय राजकारण घडवणार याकडे सातारा येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.