नातेवाईक उपस्थित नसताना डेडबॉडी कशी… महिला डॉक्टर प्रकरणात पोलिसांना मोठा झटका, फलटण..

महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर मोठा संशय व्यक्त केला जातोय. थेट आता पोलिसच अडचणीत आल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली जात आहे.

नातेवाईक उपस्थित नसताना डेडबॉडी कशी... महिला डॉक्टर प्रकरणात पोलिसांना मोठा झटका, फलटण..
Satara Doctor Death
| Updated on: Oct 27, 2025 | 1:44 PM

डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर विविध खुलासे होताना दिसत आहेत. अनेक दावे केली जात असून संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर एक नोट लिहून ठेवली. ज्यामध्ये पीएसआयसोबतच अजून एका व्यक्तीवर गंभीर आरोप करण्यात आली. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर आरोपी पीएसआय गोपाळ बदने हा फरार झाला होता. मात्र, त्यानंतर बडतर्फ होण्याच्या भीतीने त्याने पोलिस स्टेशन गाठले. आता या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी काही गंभीर खुलासे केले आहेत. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात असून काहीतरी मोठे लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

आता नुकताच या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी म्हटले की, तिचे नातेवाईक आले नसताना तिची डेड बॉडी का उचलली…? नातेवाईक उपस्थित नसताना संपदा मुंडे यांची डेड बॉडी पोलिसांनी उचलल्याने संशय व्यक्त केला जात आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी कधीही जातीच राजकारण करत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली कालची क्लीन चीट म्हणजे पोलिसांनी तपास थांबवावा असा अलिखित नियम आहे.

आमचा दाट संशय आहे की, संपदा मुंडेची हॉटेलवर नेऊन हत्या करण्यात आली. हातातील सुसाईट नोट गायब झाली आहे का? ती मुलगी चार पाणाचं पत्र लिहू शकते ती हातावर का लिहणार? निंबाळकर हे चौकशीच्या कक्षेत आले पाहिजे, असेही यावेळी त्यांनी म्हटले. आता संपदा मुंडे प्रकरणाला वेगळे वळण लागले असून गंभीर आरोप सातत्याने केली जात आहेत.

माझा कोणावर संशय आहे त्यांची मी नाव सांगणार आहे. सुसाईट नोट गायब झाली आहे. बनकर आणि बदने दोन्ही वेगळे आहेत का? त्यांची नावे टाकून दिशाभूल केली जात आहे का….? रणजीत निंबाळकर चौकशीच्या कक्षात आलेच पाहिजेत, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकारणाला वेगळे वळण आल्याचेही सध्या बघायला मिळतंय.