VIDEO | साताऱ्यातील वणवे धुमसतेच, जानाई मळाई डोंगरावर जाणाऱ्या भाविकांची गैरसोय

| Updated on: Mar 29, 2021 | 10:03 AM

जानाई मळाई डोंगरावरील शेकडो एकर क्षेत्रावरील वनसंपदा वणव्यात जळून खाक झाली आहे. (Satara Janai Malai Mountain Fire)

VIDEO | साताऱ्यातील वणवे धुमसतेच, जानाई मळाई डोंगरावर जाणाऱ्या भाविकांची गैरसोय
साताऱ्यातील प्रसिद्ध जानाई मळाई डोंगरावर वणवे
Follow us on

सातारा : सातारा शहरालगत असणाऱ्या डोंगरांवर वणवे लावण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. वन विभागाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून जानाई मळाई डोंगरावर लागलेला वणवा अजूनही धुमसत आहे. त्यामुळे डोंगरावरील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. (Satara Janai Malai Mountain Fire)

देवीच्या दर्शनाला भाविक डोंगरावर

जानाई मळाई डोंगरावरील शेकडो एकर क्षेत्रावरील वनसंपदा वणव्यात जळून खाक झाली आहे. मंगळवार, शुक्रवार आणि अमावस्या-पौर्णिमा यानिमित्त डोंगरावर देवीच्या दर्शनाला भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र या वणव्यामुळे अनेकांना जीव मुठीत धरुन डोंगर चढावा लागत आहेत.

वणवा पेटवला जात असल्याचा संशय

या महिन्यात सातारा जिल्हयात 15 ते 20 वेळा डोंगरांना वणवे लागले आहेत. वणवा जाणुनबुजून पेटवला जात असल्याचा संशय आहे. वन विभागाने वेळेत लक्ष घालून वणवा लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पुण्यातील नवीन कात्रज बोगद्याजवळील डोंगराला काही दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती.  कात्रज घाटातील शिंदेवाडी गावाजवळ असणाऱ्या डोंगरावर हा वणवा पेटला होता. घनदाट जंगलात लागलेल्या आगीमुळे अनेक झाडं जळून खाक झाली.

संबंधित बातम्या :

VIDEO : कात्रज बोगद्याजवळ डोंगरावर वणवा, आग आणखी पसरण्याची शक्यता

(Satara Janai Malai Mountain Fire)