शिवसेना पक्षनिधीबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा; शिंदे गटाच्या या नेत्याने सांगितलं

आता पक्षाची कार्यपद्धती, पक्षाचे विचार आणि शाखा यावर कब्जा घेण्याची गरज नाही. ते नियमाप्रमाणे आमचं आहे, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला.

शिवसेना पक्षनिधीबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा; शिंदे गटाच्या या नेत्याने सांगितलं
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 3:49 PM

सातारा : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले. आता शिवसेना पक्षनिधीवर शिंदे गटाने दावा केला आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात आलंय. शिवसेनेचा पक्ष निधी ठाकरे गटाने अन्य खात्यात वळवला असल्याची माहिती आपल्याला नाही. आम्ही आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख दरवर्षी निधी जमा करायचो. मात्र तो कोणत्या खात्यात ठेवत होते, याची माहिती मला नाही. याबाबत उद्या होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल. मग त्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

त्यासाठी आम्ही प्रयत्न केले

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले. या गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेवर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. अमित शहा बोलले असतील ते त्यांचे मत आहे. आम्ही सुरुवातीपासून सांगतो आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा ज्वलंत विचार सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या लावणीला बांधला. ते सोडवण्यासाठी आम्ही सहा महिन्यांपूर्वी प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

विचार, शाखा नियमानुसार आमच्याच

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि सेनेच अधिकृत असणारं धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला दिलं आहे. उठावावेळी शिवसेनेच्या 40 आमदारांनी, 13 खासदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आम्ही शिवसेना सोडलेली नाही. अशी भूमिका घेतली होती ती न्यायाची होती. सत्याची होती यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता पक्षाची कार्यपद्धती, पक्षाचे विचार आणि शाखा यावर कब्जा घेण्याची गरज नाही. ते नियमाप्रमाणे आमचं आहे, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला.

आम्ही नियम आणि कायद्याचं पालन करणारे आहोत. ठाकरे गटाने ठरावं करावा की, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं पालन करायचं. का कायदा हातात घेऊन बेकायदेशीर कृत्य करायचं, हे त्यांनी ठरवायचं, असंही शंभूराज देसाई म्हणाले.

संजय राऊत यांनी किंमत  चुकवावी लागेल

संजय राऊत यांनी शिंदे गटावर आरोप केलेत. २ हजार कोटी रुपयांना पक्ष आणि चिन्ह विकत घेतल्याचीही टीका राऊत यांनी केली. त्यावर बोलताना संभूराज देसाई म्हणाले, राऊत यांच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही. राऊत यांना निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्थेवरील वक्तव्याची किंमत चुकवावी लागेल.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.