“संजय राऊत यांनी ‘त्या’ वक्तव्याची किंमत चुकवावी लागेल”; शिंदे गटाच्या मंत्र्यानं थेट इशाराच दिलाय…

शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटासह भाजपवर आणि न्यायपालिकेवरही जोरदार निशाणा साधला.

संजय राऊत यांनी 'त्या' वक्तव्याची किंमत चुकवावी लागेल; शिंदे गटाच्या मंत्र्यानं थेट इशाराच दिलाय...
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 2:55 PM

मुंबईः शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर राज्याती राजकारण अनेकार्थाने ढवळून निघाले आहे. न्यायालयीन लढ्यात हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले असले तरी सध्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही शिंदे गटाची बाजू घेत त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे तळवे चाटले” अशी टीका केली होती. गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकारची टीका केल्यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनीही शिंदे गटावर आणि भाजपवरही जोरदार टीका केली.

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटले अशी टीका केल्यानंतर त्यांच्या या टीकेचे समर्थन करत त्यांनी अमिथ शाह यांना समर्थन दिले आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचे समर्थन करत असतानाच ते म्हणाले की, अमित शाह जे बोलले असतील ते त्यांचे मत आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून आम्ही सांगतो आहे.

की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा ज्वलंत विचार सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी व कॉग्रेसच्या दावणीला बांधले आणि ते सोडवण्यासाठी आम्ही सहा महिन्यापूर्वी प्रयत्न केले अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे.

त्यामुळे आता अमित शाह यांच्या वक्तव्यावरून आणि शंभूराज देसाई यांनी समर्थनाथ घेतलेल्या भूमिकेमुळे हे राजकारण आता आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटासह भाजपवर आणि न्यायपालिकेवरही जोरदार निशाणा साधला.

न्यायालयीन लढतीमध्ये पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर संजय राऊत ही न्यायालयं ही सत्ताधाऱ्यांच्या खिसात असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांनी त्यांच्या या वक्तव्याची तक्रार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर आता पुन्हा एकदा त्यांनी संजय राऊत यांना निवडणूक आयोगावर केलेल्या बेजबाबदार वक्तव्याची किंमत चुकवावी लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच संजय राऊत यांचा शिंदे गटावर आरोप 2 हजार कोटींना पक्ष व चिन्ह विकत घेतले असल्याचीही टीका त्यांनी केली होती.

त्यावर बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत यांच्या बोलण्याला आम्ही काडीची ही किंमत देत नाही मात्र निवडणूक आयोगाच्या निकालावर आणि न्याय व्यवस्थेवर केलेल्या बेजबाबदार वक्तव्याची किंमत त्यांना लवकरच चुकवावी लागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.