धुळ्यात आग्रा रोडवर 55 लाखांची रोकड जप्त, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गात 3 कोटींची संपत्ती जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार कारवाई सुरु आहेत. धुळे शहरातील आग्रा रोडवर मुख्य बाजारपेठेमध्ये 55 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

धुळ्यात आग्रा रोडवर 55 लाखांची रोकड जप्त, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गात 3 कोटींची संपत्ती जप्त
cash (file Photo)
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 10:30 PM

मनेश मासोळे, Tv9 मराठी, धुळे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार कारवाई सुरु आहेत. धुळे शहरातील आग्रा रोडवर मुख्य बाजारपेठेमध्ये 55 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एका कापड व्यापाऱ्याकडून रोकड जप्त करण्यात आलीय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा विभागाने ही कारवाई केली आहे. नोटांची मोजणी सुरू आहे. सुमारे 55 लाख रुपये रक्कम असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी 3 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी इनकम टॅक्स विभाग तपासणी करणार आहेत. तोवर नोटा ट्रेझरी बँकेमध्ये जप्त असणार आहे.

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक पथकाने जोरदार कारवाई केली आहे. मतदारसंघात 3 कोटींची कारवाई करण्यात आलीय. 6 मार्चपासून 6 मे पर्यंत या कालावधीत 80 ठिकाणी कारवाई केली गेलीय. यात रोकड आणि दारु मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलीय. 14 लाख 50 हजार रुपये रोकड तर 2 कोटी 46 लाख रुपयांची 91 हजार लीटर दारु जप्त करण्यात आलीय. 30 लाख रुपयांचा अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

आचारसंहिता काळात राज्यभर अंमलबजावणी यंत्रणाद्वारे 24 एप्रिलपर्यंत करण्यात आलेल्या जप्तीची माहिती

  • रोख रक्कम – 43.96 कोटी
  • दारू – 34.78 कोटी रुपयांची दारू जप्त
  • ड्रग्ज – 216.47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
  • मौल्यवान धातू – 88.37 कोटी रुपये
Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.