“हिंदू मुलीकडे पाहाल तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन”; भाजप नेत्याचा थेट इशारा…

| Updated on: Dec 13, 2022 | 5:07 PM

हिंदू मुलींकडे पाहाल तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन असा इशारा लव्ह जिहाद प्रकरणी पाटणमध्ये आज महाआक्रोश मोर्चात बोलताना नितेश राणे यांनी दिला आहे.

हिंदू मुलीकडे पाहाल तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन; भाजप नेत्याचा थेट इशारा...
Follow us on

पाटणः हिंदू मुलींकडे पाहाल तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन असा इशारा लव्ह जिहाद प्रकरणी पाटणमध्ये आज महाआक्रोश मोर्चात बोलताना नितेश राणे यांनी दिला आहे. आपल्या इथे हिंदूंची संख्या जास्त असूनही आणि मूठभर जिहादी असूनही ते आपल्याला भारी पडत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होण्याची कुवत आहे का आपली असा सवाल त्यांनी हिंदूं बांधवांना केला आहे. यावेळी त्यांनी लव्ह जिहाद कायद्याविषयीही मागणी केली आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी लव्ह जिहादविषयी जोरदार हल्लाबोल करत हिंदू धर्मानं आता जागं झाले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या समाजातील मुलींवर अन्याय, अत्याचार होत आहेत. तरीही त्याबद्दल कोणतीही कारवाई का केली जात नाही असा सवाल त्यांनी पोलिसांनाच केला आहे.

पाटणमधील महामोर्च निघणार असल्याचा प्रचार करण्यात येत होता. त्यावेळी या प्रचारासाठी फिरणारी रिक्षावर पोलिसांनी आक्षेप घेतला. त्यावेळी पोलीस निरीक्षकाला आपण फोन लावून कसा इशारा दिला हेही यावेळी त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात जर लव्ह जिहाद ही प्रकरणं वाढली गेली तर या भूमीला महाराष्ट्र म्हणतात असा इशाराही त्यांनी लव्ह जिहादचं समर्थन करणाऱ्यांना दिले आहे.

पाटणमधील महाआक्रोश मोर्चामध्ये भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट डोळे काढून तेच डोळे म्युझियमध्ये ठेवण्याची भाषा केल्याने हा वाद उफाळून येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे वाद होणार का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

आमदार नितेश राणे यांनी लव्ह जिहादचा कायदा करण्याची मागणी केल्यानंतर त्याविषयी बोलताना अजित पवार यांनी पलटवार करत कुणाच्याही मागणीवरून कायदा बनत नसतो असा टोला त्यांनी निलेश राणेंना लगावला आहे.