“हे मूठभर जिहादी, आपल्याला भारी पडत असतील तर…”; लव्ह जिहादीविषयी भाजपच्या नेत्यानं थेट धर्माला ललकारलं

पाटणमधील लव्ह जिहादाविरोधात नितेश राणे यांचा मोर्चा निघणार होता. त्याआधी त्याचा रिक्षाच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत होता.

हे मूठभर जिहादी, आपल्याला भारी पडत असतील तर...; लव्ह जिहादीविषयी भाजपच्या नेत्यानं थेट धर्माला ललकारलं
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 4:30 PM

पाटणः ‘समोरचे कुणी दिसणार पण नाही, एवढी संख्या आज हिंदू समाजाची आहे.’ पण एवढी संख्या असून होणार काय, त्याचा फायदा काय असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी लव्ह जिहादवर उपस्थित केला. नितेश राणे यांनी लव्ह जिहाद वरून बोलताना हिंदू आणि लव्ह जिहादसारख्या प्रकरणावरून त्रास देणाऱ्यांची संख्या किती तर हिंदूच्या तुलनेत अगदीच तुरळक आहेत.

तरीही आपली संख्या एवढी असूनही हे मूठभर जिहादी आपल्याला भारी पडत असतील तर आपल्या छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होण्याचा अधिकार आहे का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सध्या हिंदू धर्मातील मुलींवर अन्याय अत्याचार होतात. तरीही आम्ही गप्प का असा प्रश्न आपण हिंदू म्हणून एकमेकांना विचारला पाहिजे, तसेच हिंदू म्हणून नेमकं आपण कसं जगतो आहोत आणि कुणासाठी जगतो असा प्रश्न करून त्यांनी लव्ह जिहादसारखे प्रकार आपल्या राज्यातील थांबले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आपल्या समाजाकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांच्या मनात भीती आणि वचन निर्माण करत नाही. तोपर्यंत हिंदू समाज म्हणून आपल्याला कधीही न्याय मिळणार नाही असंही नितेश राणे यांनी यावेळी सभेला संबोधित करताना आपले मत व्यक्त केले.

पाटणमधील लव्ह जिहादाविरोधात नितेश राणे यांचा मोर्चा निघणार होता. त्याआधी त्याचा रिक्षाच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत होता.

त्यावेळी पोलिसांनी त्या रिक्षातून चाललेल्या प्रचारावरून आक्षेप घेतला. त्यानंतर नितेश राणे यांनी पोलिसांना केलेला फोन आणि नंतर पोलिसांना पोलीस स्थानकात येऊन धिंगाणा घालणार असा इशारा दिलेला असंही त्यांनी यावेळी सांगितले.

हा सवाल आपण उपस्थित करायल हवा सध्या अत्याचार होतो तरीही आम्ही गप्प का असा प्रश्न एकमेकांना आपण विचारला पाहिजे हिंदू म्हणून नेमकं आपण कसं जगतोय.

कुणासाठी जगतोय, आपल्या समाजाकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांच्या मनात भीती वचक निर्माण करत नाही तोपर्यंत हिंदू समाज म्हणून आपल्याला कधीही न्याय मिळणार नाही असंही नितेश राणे यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.