Satara Crime : मुलाने रडत रडत विद्युत पंपाच्या पेटीकडे दाखवले बोट…मग उठली बोंब, संशयाच्या भुताने प्रेमाचा गळा घोटला

Sangli Shirala Crime News : सांगलीत चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा खून केला. तर खून केल्यानंतर पत्नीचा मृतदेह त्याने विद्युत पंपाच्या पेटीत ठेवला. प्रकरणात शिराळा पोलिसांनी आरोपी पती मंगेश कांबळे याला अटक केली.

Satara Crime : मुलाने रडत रडत विद्युत पंपाच्या पेटीकडे दाखवले बोट...मग उठली बोंब, संशयाच्या भुताने प्रेमाचा गळा घोटला
साताऱ्यात प्रेमाला संशायाची नजर
Image Credit source: टीव्ही ९मराठी
| Updated on: Mar 28, 2025 | 2:02 PM

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. संशयीताने खूना नंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राजक्ता मंगेश कांबळे (वय 28) असे मृत महिलेचे नाव आहे. तर खून केल्यानंतर संशयित पती मंगेश चंद्रकांत कांबळे हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

गावी आला नि गेम केला

मंगेश आणि प्राजक्ताचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता. आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहेत. मांगले वारणानगर रस्त्यावर, ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या घरात ते भाड्याने राहतात. चार दिवसापूर्वी मंगेश त्यांची पत्नी प्राजक्ता आणि सहा वर्षाचा मुलगा शिवम, तीन वर्षाची मुलगी शिवन्या मुंबईहून तिथे राहायला आले होते.

प्रेमाला संशयाची दृष्ट

काल सकाळी भाऊ निलेश आणि देववाडी गेले होते. दरम्यान सकाळी दहाच्या दरम्यान पती-पत्नीचा वाद झाला होता. तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा अवळून खून केला. त्यानंतर बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत हात पाय दुमडून मृतदेह झाकून ठेवला. खोलीला बाहेरून कुलूप घालून भावाला फोन केला.

मुलाने सांगितली घटना

मी शिराळ्याला जाणार आहे गाडी घेऊन ये असा निरोप दिला. भाऊ घरी आला आणि आरोपी गाडी घेऊन गेला. तर दरम्यान मंगेशचा सहा वर्षांचा मुलगा शिवम दारातच रडत होता. त्यावेळी निलेशनी त्याला समजावून काय झाले असे विचारले त्यावेळी सहा वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पाचे दोघांचे भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. तर दरम्यान या प्रकरणात मयत प्राजक्ता कांबळेचा पती मंगेश कांबळे याला अटक केली असून पुढील तपास शिराळा पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जगंम यांनी दिली आहे.