Satara : शशिकांत शिंदे तुम्हाला थंड करुन घरात बसवायची आमची ताकद, शिवेंद्रराजेंचा सज्जड दम

| Updated on: Dec 08, 2021 | 10:12 PM

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना अध्यक्ष होण्यासाठी माझी शिफारस कमी पडली अशी बोचरी टिला केली होती. त्याला आता शिवेंद्रराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Satara : शशिकांत शिंदे तुम्हाला थंड करुन घरात बसवायची आमची ताकद, शिवेंद्रराजेंचा सज्जड दम
शिवेंद्रराजे भोसले शशिकांत शिंदे
Follow us on

सातारा : सातारच्या राजकारणात दोन्ही राजेंची नेहमीच चर्चा असते, मग ती आपआपसातील स्पर्धेवरून असो किंवा विरोधकांना बेधडक बोलण्यावरून असो. सध्या साताऱ्यात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. आधीही दोघे एकमेकांवर टीका करताना दिसून आले. आणि हाच सघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसून येतो आहे. यावेळी तर शिवेंद्रराजेंनी थेट शशिकांत शिंदेंना सज्जड दम भरलाय. त्यामुळे राजे पुन्हा चर्चेत आलेत.

साताऱ्यात राजे विरुद्ध शशिकांत शिंदे

सातारा जिल्ह्यात आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे आरोप-प्रत्यारोप काही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीयेत. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना अध्यक्ष होण्यासाठी माझी शिफारस कमी पडली अशी बोचरी टिला केली होती. या टिकेला भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उत्तर दिलंय. शशिकांत शिंदे यांनी माझ्यासाठी कधीच शिफारस केली नसून मी सुरुवातीला चेअरमन झालो, त्या बैठकीत सुद्धा शशिकांत शिंदे यांनी माझ्या ५ वर्षांच्या चेअरमनपदाला विरोध दर्शविला होता. असं शिवेंद्रराजे म्हणाले आहेत.

तुम्हाला थंड करुन घरी बसवायची ताकद आमच्यात

शशिकांत शिंदे हे धादांत खोट बोलत आहेत. असे सांगून आमदार शशिकांत शिंदे यांनी जावळी तालुक्यात निवडणुकीच्या निमित्ताने रान पेटवलं, तर तुम्हाला थंड करुन घरी बसवायची ताकद आमच्यात आहे. असा इशारा शिवेंद्रराजे भोसलेंनी शशिकांत शिंदेंना दिलाय. त्यामुळे सातारचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय. गेल्या अनेक वर्षांपासून सातारच्या राजकारणावरून शशिकांत शिंदे विरुद्ध राजे हा सघर्ष सुरू आहे.

Rip cds bipin rawat : आतापर्यंतच्या हेलिकॉप्टर अपघातात या दिग्गजांना गमावले, वाचा सविस्तर

उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्रात काय करता येईल? संजय राऊत आणि प्रियंका गांधींची दिल्लीत तासभर खलबतं

जगभर ओमिक्रॉनचा झपाट्याने प्रसार, मुंबईत ओमिक्रॉनसाठी 250 बेड सज्ज; लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश