Rip cds bipin rawat : आतापर्यंतच्या हेलिकॉप्टर अपघातात या दिग्गजांना गमावले, वाचा सविस्तर

खराब हवामानामुळे MI 17 V5 हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं. अपघातात लष्करी सेवेतील एका मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्याचा मृ्त्यू झाल्यानं देशावर शोककळा पसरलीय. इतिहासात अशेच काही हेलिकॉप्टर आणि विमान अपघात घडलेत.

Rip cds bipin rawat : आतापर्यंतच्या हेलिकॉप्टर अपघातात या दिग्गजांना गमावले, वाचा सविस्तर
Army helicopter Crash

मुंबई : भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचा तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. खराब हवामानामुळे MI 17 V5 हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं. अपघातात लष्करी सेवेतील एका मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्याचा मृ्त्यू झाल्यानं देशावर शोककळा पसरलीय. इतिहासात अशेच काही हेलिकॉप्टर आणि विमान अपघात घडलेत. या अपघातांमध्ये देशानं अनेक मोठ्या व्यक्तींना गमावलंय.

  1. YSR राजशेखर रेड्डी यांचा अपघात

2 सप्टेंबर 2009 ला आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री YSR राजशेखर रेड्डी सकाळी हैदराबादहून चितूरसाठी निघाले होते…मात्र वाटेतच त्यांचं हेलिकॉप्टर गायब झालं. कित्येक तास सर्च ऑपरेशन सुरु होतं. मात्र YSR राजशेखर रेड्डी यांच्या हेलिकॉप्टरचा पत्ता
लागलाच नाही. अखेर हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये YSR राजशेअर रेड्डी यांच्यासह 4 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.

2. संजय गांधी यांचा विमान अपघातात
दिवस होता 23 जून 1980 चा, भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चिरंजीव संजय गांधी यांचा विमान अपघातात
मृत्यू झाला. दिल्लीच्या विमानतळावरुन सकाळी 7 वाजून 58 मिनिटांनी विमानाचं उड्डाण झालं. आणि ठिक 8 वाजून 10 मिनिटांनी संजय गांधी यांचं विमान क्रॅश झालं. संजय गांधी स्वत: विमान चालवत होते. सफदरजंग विमानतळावरुन अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरच एका झाडाला विमान धडकल्याने संजय गांधींचं विमान क्रॅश झालं.

3. माधवराव सिंधिया यांचा विमान अपघातात मृत्यू
30 सप्टेंबर 2001 काँग्रेसचे दिग्गज नेते माधवराव सिंधिया यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. दिल्लीवरुन माधवराव सिंधिया यांनी कानपूरसाठी उड्डाण घेतलं होतं. मात्र मैनपूरजवळ त्यांचं विमान क्रॅश झालं यात माधवराव सिंधिया यांच्यासह इतर 6 जणांचा मृत्यू झाला. पायलटचा दिल्ली आणि लखनौशी संपर्क तुटला होता. खराब हवामानामुळे माधवराव सिंधियांचं विमान कोसळलं. यात त्यांचा मृत्यू झाला.

4. जीएम बालयोगी यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन
3 मार्च 2002 ला तत्कालीन लोकसभा अध्यक्ष जीएम बालयोगी यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात इमरजन्सी लँडिंग करताना बालयोगींचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं. दृश्यमानता कमी असल्याने पायलटने हेलिकॉप्टर जमिनीवर लँड करण्याचा प्रयत्न केला. मात्र एका तलावामध्ये हेलिकॉप्टर लँड झालं. यात जीएम बालयोगी यांचं निधन झालं.

6. घाटकोपर परिसरात चार्टर्ड विमान कोसळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

28 जून 2018 ला मुंबईच्या घाटकोपर परिसरात चार्टर्ड विमान कोसळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जुहूच्या विमानतळावरुन विमानानं उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच चार्टर्ड विमान निर्माणाधीन इमारतीवर कोसळलं. खरतर विमानाची चाचणी घेण्यासाठीच जुहू विमानतळावरुन या विमानानं उड्डाण घेतलं…मात्र विमानावरचं नियंत्रण सुटलं. घाटकोपरचा परिसर तसा रहदारीचा. त्यामुळे विमानाच्या को-पायलट मारिया यांनी एका निर्माणाधीन इमारतीवर विमानाचं क्रॅश लँडिंग करुन अनेकांचे प्राण वाचवले.  विमान इमारतीवर कोसळताच मोठी आग लागली…यात रस्त्यावरुन जाणाऱ्या एका पादचाऱ्याचाही जळून मृत्यू झाला.

7. सराव सुरु असतानाच वायुदलाचे 2 विमान अवकाशातच एकमेकांना धडकले

20 फेब्रुवारी 2019 रोजी कर्नाटकमध्ये वायुसेनेच्या यलहंका तळावर एअर शोसाठी सराव सुरु होता. सराव सुरु असतानाच वायुदलाचे 2 विमान अवकाशातच एकमेकांना धडकले. यातलं एक विमान कोसळलं. यात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले.

8. कोझिकोडच्या विमानतळावर धावपट्टीवरुन विमान घसरलं
7 ऑगस्ट 2020 संध्याकाळची वेळ होती. दुबईवरुन आलेलं एअर इंडियाचं विमान कोझिकोडच्या विमानतळावर लँड होत होतं.
मात्र धावपट्टीवरुन विमान घसरलं. आणि धावपट्टी पलीकडच्या खोल भागात विमान कोसळलं. या अपघातात पायलटसह 19 जणांना जीव गमवावा लागला. कोझिकोडचं विमानतळ हे टेबल-टॉप प्रकारातलं आहे. म्हणजे धावपट्टीचा भाग हा आजबाजूपेक्षाकाही मीटर उंचीवर आहे. त्यामुळेच विमान घसरल्यानंतर ते खोल भागात कोसळलं.  विमान कोसळल्यानंतर विमानाचे अक्षरश: दोन तुकडे झाले होते.

9. आसाराम बापूंचंही 2012 मध्ये हेलिकॉप्टर क्रॅश

30 ऑगस्ट 2012 ला लैंगिक छळाच्या आरोपाखाली सध्या जेलमध्ये असलेल्या आसाराम बापूंचंही 2012 मध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. गुजरातच्या गोध्रामध्ये एका कार्यक्रमासाठी आसाराम बापू आले होते. मात्र, हेलिकॉप्टरचं लँडींग होतानाच अपघात झाला. मात्र, हेलिकॉप्टरमधल्या कुणालाच दुखापत झाली नाही.

10. कराचीमध्ये एक मोठा विमान अपघात

22 मे 2020 रोजी पाकिस्तानच्या कराचीमध्ये एक मोठा विमान अपघात झाला. लाहोरच्या विमानतळावरुन विमानानं उड्डाण घेतलं. विमानामधून तब्बल 100 प्रवासी प्रवास करत होते.  मात्र कराचीमध्ये विमान लँड होण्याआधीच रहिवासी भागामध्येच विमान क्रॅश झालं…तब्बल 98 लोकांचा या अपघातात मृत्यू झाला. विमान क्रॅश झाल्यानंतर धुराचे मोठे लोळ दिसत होते.

11. वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांचा मृत्यू

29 नोव्हेंबर 2015 रोजी वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर कत्रामध्ये काळाने घाला घातला. जम्मू काश्मीरच्या कत्रामधून सांजी छतकडे हेलिकॉप्टरमधून 2 कुटुंब निघाले. मात्र, वाटेतच हेलिकॉप्टरला गिधाड धडकल्याने हेलिकॉप्टर क्रॅश झाल. दोन्ही कुटुंबातील 7 जणांचा यात मृत्यू झाला. मृतांमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीचाही दुर्दैवी अंत झाला. मात्र महिला पायलटने एका मोकळ्या जागेत क्रॅश लँड केल्यानं अपघातात अनेकांचा जीव वाचला.

12. अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय वायुसेनेचं हेलिकॉप्टर क्रॅश

मागच्याच महिन्यात 18 नोव्हेंबर 2021 रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय वायुसेनेचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं. सुदैवानं याअपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.  ज्या ठिकाणाहून हेलिकॉप्टर उड्डाण घेणार होतं. त्या ठिकाणीच वायुसेनेचं हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं.

13. केदारनाथ मंदिराजवळ वायुसेनेचं हेलिकॉप्टर क्रॅश

4 एप्रिल 2018 रोजी केदारनाथ मंदिराजवळ वायुसेनेचं हेलिकॉप्टर क्रॅश होतानाची दृश्यं मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली. सामानाची वाहतूक करणारं वायुसेनेचं हे हेलिकॉप्टर होतं. केदारनाथ मंदिराजवळच पायलट हेलिकॉप्टरचं लँडिंग करत होता. मात्र जमिनीवर लँड होताच हेलिकॉप्टर क्रॅश झालं. सुदैवानं हेलिकॉप्टरमधील प्रवाशांना दुखापत झाली नाही.

14. फडणवीस 3 वेळा बचवले

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकदा नव्हे तर 3 वेळा हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेत.  25 मे 2017  लातूरच्या निलंग्यातून देवेंद्र फडणवीस मुंबईकडे उड्डाण घेत होते. हेलिकॉप्टर हवेत उडालंही. मात्र अवघ्या काही सेकंदात जोरदार हवेमुळे
हेलिकॉप्टर हेलकावे खाऊ लागलं. त्यातच हायटेन्शन वायरल हेलिकॉप्टर धडकलं आणि फडणवीसांचं हेलिकॉप्टर खाली कोसळलं. सुदैवानं फडणवीसांसह पायलटही सुखरुप राहिले. कधी खराब हवामान, कधी इंजिन फेल झाल्यानं, तर कधी हेलिकॉप्टरच्या पंख्याला काहीतरी धडकल्याने अपघाताच्या घटना घडल्या. मात्र या अपघातांमध्ये देशाने अनेक मोठ्या व्यक्तींना गमावलंय.

उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्रात काय करता येईल? संजय राऊत आणि प्रियंका गांधींची दिल्लीत तासभर खलबतं

जगभर ओमिक्रॉनचा झपाट्याने प्रसार, मुंबईत ओमिक्रॉनसाठी 250 बेड सज्ज; लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

‘संजय राऊतांचे खरे गुरु शरद पवारच’, त्या फोटोवरुन भातखळकरांचा टोला, राणे बंधुंचीही टीका; शिवसेनेचं उत्तर काय?

Published On - 9:51 pm, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI