Video : साताऱ्यात धामण जुळ्यांचा थरारक खेळ, सापांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

| Updated on: Mar 31, 2022 | 10:57 AM

कराड (Karad) तालुक्यातील जुने येरवळे (Yerwale) गावातील नागरिकांना धामण जातीच्या सापांचा खेळ पाहायला मिळाला. दुपारी भर उन्हात हा खेळ चांगला रंगला होता. सापांचा खेळ सुरू असल्याची माहिती मिळताचं परिसरात लोकांची गर्दी झाली. अनेकांनी सापांचा खेळ आपल्या मोबाईलमध्ये (Mobile) कैद केला आहे.

Video : साताऱ्यात धामण जुळ्यांचा थरारक खेळ, सापांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
साताऱ्यात धामण जुळ्यांचा थरारक खेळ
Image Credit source: TV9
Follow us on

सातारा – कराड (Karad) तालुक्यातील जुने येरवळे (Yerwale) गावातील नागरिकांना धामण जातीच्या सापांचा खेळ पाहायला मिळाला. दुपारी भर उन्हात हा खेळ चांगला रंगला होता. सापांचा खेळ सुरू असल्याची माहिती मिळताचं परिसरात लोकांची गर्दी झाली. अनेकांनी सापांचा खेळ आपल्या मोबाईलमध्ये (Mobile) कैद केला आहे. विशेष म्हणजे लोकांची गर्दी असताना सुध्दा साप जागेवरून हलले नाहीत. बराच काळ त्याचा खेळ रस्त्याच्या एका कोपऱ्यात सुरू होता. कराड परिसरात साप खेळत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. शेतात किंवा अडचणीच्या ठिकाणी सापांचा असा खेळ पाहायला मिळतो. परंतु काल येरवळे गावातील नागरिकांना सापांचा खेळ रस्त्यात पाहायला मिळाला.

नेमकं काय आहे व्हिडीओत

येरवळे गावातल्या जाधव गल्लीत सिमेंट कॉक्रीटचा रस्ता आहे. त्याच्याशेजारी एक जुन्या पध्दतीचा मांडव दिसत आहे. मांडवाच्या दरवाजात दोन धामण जातीच्या सापांनी एकमेकांना गुंडाळून घेतल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. तसेच खेळ पाहायला आलेल्या नागरिकांचा गोंधळ ऐकू येत आहे. दोन्ही साप उंच झेप घेत खेळत आहेत. बराचकाळ खेळून झाल्यानंतर मांडवाच्या शेजारी असलेल्या अडचणीत ते दोन्ही साप निघून गेल्याचं दिसत आहे.

साप त्यांच्या धुंदीत असल्याने रस्त्यात खेळत राहिले

कराड तालुक्यातील येरवळे जुने गावठाण येथील जाधव आळीत सापांचा खेळ सुरू होता. कडक उन्हाच्या भर दुपारी धामण सापांच्या जुळ्याचा खेळ चांगलाचं रंगला होता. कोंबड्यांचा कलकलाट झाल्याने लोकांनी घराबाहेर येऊन पाहिले. तर धामण जुळ्यांचा खेळ अगदी रंगात आला होता. साप खेळत असल्याची माहिती तात्काळ परिसरात व्हायरल झाली. त्यामुळे सापांचा खेळ पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. सापांचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी तिथं दंगा केला. परंतु साप त्यांच्या धुंदीत असल्याने रस्त्यात खेळत राहिले. ज्यावेळी सापांचा खेळ सुरु असतो. त्यावेळी त्यांच्या अंगावर नवीन कपडा टाकल्यास मनातील इच्छा पुर्ण होतात अशी अंधश्रध्दा गावात आहे. पण गर्दीतील कोणत्याही नागरिकांनी हे कृत्य करण्याचं धाडस केलं नाही. बघ्यांनी व्हि़डीओ मोबाईलमध्ये कैद केला.

Satish Uke ED Raid | नागपुरातील वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांविरोधातील याचिकेमुळे चर्चेत

Rimi Sen | ‘धूम’गर्ल रिमी सेनची फसवणूक, बिझनेसमनकडून 4.40 कोटींना चुना

IPL 2022 : विजयाच्या शोधातील संघ आमने-सामने, मोईनमुळे सीएसकेला बळ, आयुषकडेही असणार लक्ष?