Special Report | अफजलखानाच्या कबरीशेजारच्या 2 कबरी कुणाच्या?

अफजल खानाच्या कबरी बरोबर सय्यद बंडा याची देखील कबर शेजारीच होती. मात्र अनधिकृत बांधकाम पाडत असताना या दोन्ही कब्ररींच्या काही अंतरावरच आणखी दोन कबर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहेत.

Special Report | अफजलखानाच्या कबरीशेजारच्या 2 कबरी कुणाच्या?
Chetan Patil | Updated on: Nov 12, 2022 | 10:56 PM

सातारा :  इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्या लगत असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले आहे. या ठिकाणी अफजल खानाच्या कबरी बरोबर सय्यद बंडा याची देखील कबर शेजारीच होती. मात्र अनधिकृत बांधकाम पाडत असताना या दोन्ही कब्ररींच्या काही अंतरावरच आणखी दोन कबर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहेत. यामुळे राज्यभर खळबळ उडाली असून दोरदार चर्चा होऊ लागली आहे. याबाबत यातील एक कबर ही सेविकऱ्याची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि दुसरी कबर शिवकालीन नसल्याचे दिसून येत आहे. इतर दोन कबरी अलीकडच्या काळातील असल्याचे स्पष्ट होत आहे. या कबरीवर कोणतीही माहिती लिहिलेली नसून याबाबत जिल्हा प्रशासन माहिती घेण्याचे काम करत आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट!

Follow Us