AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SLA vs AFGA : श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, बांगलादेशचा 103 धावांनी धुव्वा

Sri Lanka A vs Afghanistan A Match Result : यजमान श्रीलंकेच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. श्रीलंकेने अफगाणिस्तानवर सहज विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली.

SLA vs AFGA : श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, बांगलादेशचा 103 धावांनी धुव्वा
Sri Lanka AImage Credit source: sri lanka cricket x account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 20, 2026 | 2:41 AM
Share

यजमान श्रीलंका टीमने ट्राय नॅशन ए सीरिजच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. श्रीलंकने या स्पर्धेत आपल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तान ए संघावर एकतर्फी विजय मिळवला. श्रीलंकेने अफगाणिस्तानसमोर 323 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर अफगाणिस्तानला संपूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. श्रीलंकेने अफगाणिस्तानला 42.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. श्रीलंकेने अशाप्रकारे अफगाणिस्तानचा 103 धावांनी धुव्वा उडवला. तर अफगाणिस्तानचं पराभवासह स्पर्धेतून पॅकअप झालं. आता रविवारी 21 जून रोजी श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात कोणता संघ मैदान मारणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे. अंतिम सामन्याबाबत जाणून घेण्याआधी श्रीलंका-अफगाणिस्तान ए सामन्यात काय झालं? हे जाणून घेऊयात.

पहिल्या डावात काय झालं?

अफगाणिस्तानने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी बोलावलं. अफगाणिस्तानने 8 विकेट्स गमावून 322 धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी अविष्का फर्नांडो, निरोशन डिकवेला आण नुवानिंदु फर्नांडो या तिघांनी सर्वाधक धावा केल्या. अविष्काने शतक झळकावलं. अविष्काने 110 धावा केल्या. निरोशनने 66 रन्स केल्या. तर निवानिंदु याने 45 धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही आपलं योगदान दिलं ज्यामुळे श्रींलेकला 322 धावांपर्यंत पोहचता आलं. अफगाणिस्तानसाठी फरिदुन दावुदझई याने चौघांना आऊट केलं. तर फरमानुल्लाह सफी याने 3 विकेट्स मिळवल्या.

अफगाणिस्तानची बॅटिंग

अफगाणिस्तानच्या टॉप 4 मधील तिघांपैकी दोघांना भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार इम्रान मीर आणि नूर उल रहमान हे दोघे आले तसेच परत गेले. फैसल शिनोझादा याने 9 रन्स केल्या. हसन ईसाखिल याने अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक धावा केल्या. हसनने 74 धावांची खेळी केली. बहीर शाह याने 35, एझाज अहमदझाई याने 19 रन्स केल्या. तर फरमानुल्लाह सफी याने 43 रन्स केल्या. तर इतरांना श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर काही करता आलं नाही. श्रीलंकेसाठी दुलज समुधिता याने 5 विकेट्स मिळवल्या. तर इतरांनी साथ देत अफगाणिस्तानला गुंडाळण्यात योगदान दिलं.

श्रीलंकेची फायनलमध्ये एन्ट्री

अंतिम सामन्यात भारत-श्रीलंका आमनेसामने

दरम्यान अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेसमोर भारताचं आव्हान असणार आहे. हा सामना रविवारी 21 जून रोजी होणार आहे. आता अंतिम सामन्यात कोण विजयी ठरणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी