Satej Patil : जेव्हा मातंग समाजाचा सुजित पडला…सतेज पाटलांनी मुश्रीफांचं सगळं बाहेर काढलं, जातीवादाच्या आरोपावर सडेतोड उत्तर!
एका बाजूला माझ्यावर आरोप केले जात आहेत. मी गेल्या 25 ते 30 वर्षांपासून काँग्रेसची धुरा सांभळतोय. मी कोणाच्याही दाराजवळ बसलो नाही. माझ्यावर जातीवादाचे आरोप करताना हसन मुश्रीफ यांनी चार वेळा विचार करायला हवा होता, अशी घणाघाती टीका सतेज पाटलांनी केली.

Satej Patil Gokul Morcha : गोकुळची निवडणूक आणि या निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडी सध्या राज्यातच नव्हे तर देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वातील पॅनलने विजय नोंदवत महायुतीच्या पॅनेलचा पराभूत केला. परंतु आता गोकुळची सत्ता काबीज करण्यासाठी राज्य सरकारने नवा निर्णय घेतलाय. गोकूळ तसेच इतर काही सहकारी संस्थांवर चार संचालक प्रशासक म्हणून नेमण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अशा प्रशासकांना मतदानाचीही अधिकार देण्यात आलाय. यामुळेच सतेज पाटील चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी आज कोल्हापुरात मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला हजारो शेतकरी आणि समर्थकांनी हजेरी लावली. दरम्यान, या मोर्चात सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली. सोबतच मुश्रीफांनी केलेल्या जातीवादाच्या आरोपावरही सतेज पाटलांनी सडेतोड उत्तर दिले.
नगर समाजाचा माणूस या निवडणुकीत उभा होता
मी साडे पाच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत होतो. तुम्ही तुमच्या लेकरांना निवडून देण्यासाठी लढत होते. या निवडणुकीत माझं पोरगं उभं राहिलेलं नव्हतं. दयाजी शेळके यांच्यासारखा धनगर समाजाचा माणूस या निवडणुकीत उभा होता. दयाजी शेळके यांच्या रुपात धनगर समाजाचा माणूस उभा होता. बाबासाहेब देवकर यांच्यासारखा कार्यकर्ता उभा राहिला होता. आमचे सगळे 25 कार्यकर्ते या निवडणुकीत उभे राहिले होते,. मी 25 कार्यकर्त्यांचं नेतृत्त्व करत असेल तर यात जातीवाद कुठे आला असा थेट सवाल सतेज पाटलांनी मुश्रीफ यांना केला.
सोबतच, मी जातीवाद करणारा नाही. मी शाहू महाराजांच्या पायाजवळ बसलेलो आहे. मी जातीवाद माणणारा नाही. गोकुळचा निकाल लागल्यानंतर हसन मुश्रीफ माझा मुलगा पडला, माझा मुलगा पडला असे चार वेळा बोलले. पण मातंग समाजाचा सुजित मिनचकार पडला त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलले नाही. मराठा समाजाचे युवराजबापू पडले त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलले नाही, मी जर असं बोललो तर चालेल का? मी असं बोलत नाही, अशी बोचरी टीका सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफांवर केली.
माझ्यामुले तुम्हााल गोकुळची दारं खुली झाली
तसेच, पण एका बाजूला माझ्यावर आरोप केले जात आहेत. मी गेल्या 25 ते 30 वर्षांपासून काँग्रेसची धुरा सांभळतोय. मी कोणाच्याही दाराजवळ बसलो नाही. माझ्यावर जातीवादाचे आरोप करताना हसन मुश्रीफ यांनी चार वेळा विचार करायला हवा होता. हसन मुश्रीफ 15 वर्षे माझ्या मांडीला मांडी लावून बसले होते. 15 वर्षे सत्तेत राहिले. त्यांनी 15 वर्षे गोकुळची निवडणूक राष्ट्रवादी पक्षातून लढवली. तुम्हाला गोकुळचं दार उघडता आलेलं नाही. गोकुळचं दार तुम्हाला माझ्यामुळेच उघडलं गेलं. मी होतो म्हणून तुम्ही गोकुळमध्ये शिरले होते, अशी आठवणही सतेज पाटलांनी मुश्रीफ यांना करून दिली.