केतकीपाठोपाठ वादग्रस्त पोस्टची दुसरी घटना, पुण्यात भाजपा प्रवक्त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मारहाण

| Updated on: May 14, 2022 | 8:18 PM

Sharad Pawar, Ajit Pwar, NCP, controversia post, Pune, BJP spokeperson, शरद पवार, अजित पवार, पुणे, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा प्रवक्ते मारहाण, भाजपा

केतकीपाठोपाठ वादग्रस्त पोस्टची दुसरी घटना, पुण्यात भाजपा प्रवक्त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मारहाण
NCP beat BJP spokeperson
Image Credit source: social media
Follow us on

पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar)यांच्याबाबत अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale)हिने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टनंतर (controversial post) राज्याचे राजकीय वातावरण तापलेले असतानाच, तशीच दुसरी घटना पुण्यातही घडलीये. पुण्यात शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे भाजपाचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनाही शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. आंबेकर यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोस्ट केलेली कविता काढून टाकली होती, त्यात कोणत्याही नेत्याचे नाव नव्हते, तरीही या प्रकरणी माफी मागितली होती, असे स्पष्टीकरण भाजपाचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी दिले आहे.

नेमका काय घडला प्रकार

केतकीसारखीच एक वेगळी कविता भाजपाचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यावर त्यांच्या घरी येऊन त्यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. आंबेकरांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पा जाधव या व्यक्तीचा त्यांना फोन आला होता, की इन्कम टॅक्सविषय सल्ला हवा आहे. त्यानंतर अप्पा जाधव आणि त्यांच्या सोबत 25 ते 30 कार्यकर्ते आले, आणि त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, असे आंबेकर यांनी सांगितले.

पुण्यात राहायचे असेल तर अशा पोस्ट करु नका

अप्पा जाधव यांनी धमकी दिल्याचे आंबेकर यांनी सांगितले. जर पुण्यात राहायचे असेल तर अश्या प्रकारच्या पोस्ट करू नका, अन्यथा महागात पडेल, अशी धमकी दिल्याचं आंबेकरांनी सांगितले. त्यानंतर शिवीगाळ आणि मारहाण करुन ते निघून गेल्याचे आंबेकरांनी सांगितलेत. यावेळी चष्मा तुटल्याचाही आंबेकरांचा म्हणणे आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणा देत कार्यकर्ते निघून गेले.

या प्रकरणात आधीच मागितली होती माफीआंबेकर

त्या पोस्टमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव नव्हते आणि अपशब्द नव्हते, असे आंबेकर यांचे म्हणणे आहे. या कवितेतल्या काही ओळी चुकीच्या आहेत, याबत खासदार गिरीश बापट आणि शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगतिल्यानंतर ती पोस्ट काढल्याचे आंबेकर यांचे म्हणणे आहे. त्यानंतर वादग्रस्त ओळी काढून टाकले होते, आणि त्यानंतर जाहीर माफी सुद्धा मागितली होती, असे त्यांचे म्हणणे आहे. मारहाण झाली तेव्हाही माफी मागितल्याचे सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे.