काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचं निधन

सांगली : विधानपरिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांचं निधन झालं आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी प्रदीर्घ आजारानं अखेरचा श्वास घेतला. शिवाजीराव देशमुख हे किडनीच्या आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सांगली जिल्ह्यातल्या कोकरुड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवाजीराव देशमुखांचा अल्पपरिचय शिवाजीराव देशमुख …

shivajirao deshmukh, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचं निधन

सांगली : विधानपरिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांचं निधन झालं आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी प्रदीर्घ आजारानं अखेरचा श्वास घेतला. शिवाजीराव देशमुख हे किडनीच्या आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सांगली जिल्ह्यातल्या कोकरुड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

शिवाजीराव देशमुखांचा अल्पपरिचय

शिवाजीराव देशमुख यांचा 1 सप्टेंबर 1935 रोजी जन्म झाला होता. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवाजीराव देशमुख यांचा मुलगा सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. काँग्रेसचे एकनिष्ठ असणारा नेता आणि प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेले नेते अशी त्यांची ओळख होती.

शिराळा मतदारसंघातून ते सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेसच्या सत्तेत त्यांनी गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य अश्या जवळपास सर्व अनेक महत्वाची खात्यावर त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

  • 1992 ते 1996 मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यात मंत्री अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी पार पाडली होती.
  • 1996 साली दोन्ही पैकी एक जबाबदारी स्वीकारण्याबाबत पक्षाचा निर्णय झाल्यावर, त्यांनी पक्षकार्य करण्याचं ठरवलं. 1996 ला त्यांनी विधानसभा लढवली नव्हती.
  • त्यांनतर 1999 नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात त्यांनी विधानपरिषदेचे सभापतीपद भूषवलं होते.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *