शरद पवार यांचा अनाैपचारिक चर्चेदरम्यान पुन्हा तो मोठा दावा, जे लोक..

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यादरम्यानच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरणाबाबत मोठा दावा केला जात आहे. त्यासंदर्भात आता अजून एक अपडेट आली.

शरद पवार यांचा अनाैपचारिक चर्चेदरम्यान पुन्हा तो मोठा दावा, जे लोक..
Sharad Pawar
| Edited By: | Updated on: Feb 02, 2026 | 3:42 PM

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलल्याचे बघायला मिळतंय. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फक्त शपथच नाही तर सुनेत्रा पवार पहिल्या शासकीय दाैऱ्यावर आज साताऱ्यात आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी कोणतीही कल्पना शरद पवार यांना दिली नाही, असे स्वत: शरद पवार यांनी म्हटले. यादरम्यानच त्यांनी म्हटले होते की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबद्दल चर्चा सुरू होती. मात्र, आता या चर्चेला खंड पडला. 12 फेब्रवारी 2026 रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबद्दल घोषणा केली जाणार होती. मात्र, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलताना स्पष्ट सांगितले की, अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती.

आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबद्दल विविध दावे केली जात आहेत. यादरम्यानच शरद पवार यांच्याकडून पुन्हा याबाबतचे मोठे विधान करण्यात आले. शरद पवार यांनी म्हटले की, विलिनीकरणाच्या बैठकीत सहभागी नसणाऱ्यांना बैठकीबद्दल काय माहिती असणार असे शरद पवार यांनी म्हटले. शरद पवार यांनी हे विधान अनाैपचारिक चर्चेदरम्यान केले आहे.

शरद पवार यांनी पत्रकारांसोबत अनाैपचारिक चर्चा करत असताना म्हटले की, या विलगीकरणाच्या चर्चेत जे कोणी सहभागी नव्हते, त्यांना या संदर्भात कशी काय माहिती असणार. शरद पवार यांनी अगोदरच स्पष्ट केले होते की, या विलिनीकरणाच्या मुद्द्यात स्वत: अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि रोहित पवार हे सहभागी होते.

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वारंवार दावा केला जात आहे की, दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार होते. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांकडून हा दावा खोडून काढला जात आहे. त्यामध्येच शरद पवार यांनी अनाैपचारिक बोलताना म्हटले की, जे लोक या बैठकीत नव्हते, त्यांना याबद्दल कशी माहिती असणार.