AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळे यांचे नवे व्हॉट्सअप स्टेट्स, थेट बारामतीचा उल्लेख, मोठे संकेत, अजित पवार यांच्यासोबतचे…

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, पवार कुटुंबातील वाद पुढे आला. अजित पवार यांच्या निधनानंतर सतत व्हॉट्सअप स्टेट्स ठेवताना सुप्रिया सुळे दिसत आहेत. त्यामध्येच आता त्यांनी मोठे संकेत दिले आहेत.

सुप्रिया सुळे यांचे नवे व्हॉट्सअप स्टेट्स, थेट बारामतीचा उल्लेख, मोठे संकेत, अजित पवार यांच्यासोबतचे...
supriya sule and sunetra pawar
| Updated on: Feb 02, 2026 | 11:14 AM
Share

अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. या विमान अपघातात एकही व्यक्ती जिवंत राहिली नाही. अजित पवार सकाळी 8.10 ला मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते, यादरम्यान 8.45 ला त्यांचा विमानाचा भीषण अपघात झाला. 28 जानेवारी 2026 हा राज्यातील राजकारणासाठी काळा दिवस ठरला. अजित पवार यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. मात्र, यादरम्यानच पवार कुटुंबातील वादही थेट पुढे आला. अजित पवार यांना जाऊन काही तास झाले असताच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शरद पवार आणि पवार कुटुंबातील कोणालाही कल्पना न देता त्यांनी हा निर्णय घेतला. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत, याबद्दल त्यांच्या दोन्ही मुलांना कल्पना होती. पार्थ पवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भेटला.

सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत, याची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत सुप्रिया सुळे यांनीही तेच विधान केले. सुप्रिया सुळे या सध्या दिल्लीत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्या सतत व्हॉट्सअप स्टेट्स अजित पवार यांच्या संबंधित ठेवत आहेत. यादरम्यानच त्यांनी एक व्हॉट्सअप स्टेट्स ठेवले ज्याची तूफान चर्चा आहे.

सुप्रिया सुळे यांनी एक नवीन व्हॉट्सअप स्टेट्स ठेवले. ज्यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्यासोबत दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना सुप्रिया सुळे यांनी खास कॅप्शनही दिले. सुप्रिया सुळे यांनी @ बारातमी…… असे कॅप्शन दिले आहे.

supriya sule and sunetra pawar

या व्हॉट्सअप स्टेट्सच्या माध्यमातून काहीतरी मोठे संकेत देताना सुप्रिया सुळे या दिसत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या पण आता खंड पडल्याचे मोठे विधान स्वत: शरद पवार यांनी केले. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये पक्षाच्या विलिगीकरणाबद्दल चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, याला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी नकार दिलाय. अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?