मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ? घडामोडींना वेग
राजकारणात आता आणखी एक मोठा भूकंप पहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून थेट शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, लवकरच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोरेगाव शहरात प्रथमच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना संपर्क कार्यालय आणि तीन शाखांचे उद्घाटन पार पडले, यावेळी आमदार महेश शिंदे यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली. या कार्यक्रमात आमदार महेश शिंदे यांचा फोटो ही वगळल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. याविषयी आमदार महेश शिंदे यांना अनुपस्थितीबाबत आणि फोटो वगळल्याबाबत विचारले असता “माझे कालचे कार्यक्रम आधीच ठरलेले होते. माझ्या कुटुंबाचे आणि मतदारसंघातील सुमारे ६८ कार्यक्रम एकाच दिवशी होते, ज्यात ४२ विवाह सोहळे आणि इतर सामाजिक कार्यक्रमांचा समावेश होता. त्यामुळे मी तिथे उपस्थित राहू शकलो नाही.” असं त्यांनी म्हटलं आहे.
“राजकारणात कोणीही ताम्रपट घेऊन आलेलं नसतं. मी माझं काम प्रामाणिकपणे करत आहे. जनतेने मला निवडून दिलं आहे आणि साडेतीन वर्षे माझ्या हातात आहेत, तोपर्यंत मी फक्त विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. कोणाला फोटो लावायचे आहेत किंवा नाही, यापेक्षा जनतेची कामं होणं जास्त महत्त्वाचं आहे.” जे चौघे-पाच जण तिथे होते, त्यांनी कधीच माझं काम केलं नव्हतं. उलट त्यांनी निवडणुकीत विरोधकांच्या बाजूने काम केलं होतं. त्यामुळे अशा गोष्टींकडे मी फारसं लक्ष देत नाही.” असंही त्यांनी म्हटलं आहे. महेश शिंदे हे शिवसेना शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान दुसरीकडे अशी देखील बातमी समोर आली आहे की, भाजपकडून महेश शिंदे यांना पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी याबाबत बोलताना मोठं विधान केलं आहे. महेश शिंदे हे भाजप विचारसरणीचेच आहेत, त्यांना जर काही त्रास होत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं, आम्ही त्यांचं स्वागतच करू असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे. साताऱ्यामध्ये महेश शिंदे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असंही यावेळी गोरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महेश शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.