उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसणार? आमदारांबाबत मोठी बातमी, राजकीय वर्तुळात खळबळ

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली, 9 पैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसणार? आमदारांबाबत मोठी बातमी, राजकीय वर्तुळात खळबळ
uddhav thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 12, 2026 | 5:38 PM

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केली. या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्ष प्रवेश झाला. पक्ष प्रवेशापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडं एखून खासदारांची संख्या 9 होती, मात्र पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडे केवळ 3 खासदारच राहिले आहेत. तर दुसरीकरे शिवसेना ठाकरे गटात फूट पडण्यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडील खासदारांची संख्या 7  होती. परंतु आता शिवसेना शिंदे गटाकडील खासदारांची संख्या 13 झाल्याने राज्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

एकीकडे खासदारांनी तर शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडलीच मात्र दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे  यांच्यासाठी दुसरा मोठा धक्का होता. आता राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे  शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर यांनी मोठा दावा केला आहे.

सचिन आहीर पक्षात येणे हा पहिला टप्पा होता, लवकरच 26 आमदार शिवसेना शिंदे गटात येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक  समाजाचे नेते शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत.  त्यामुळे आगामी काळात आणखी पक्षप्रवेश होणार आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर यांनी  केला आहे. ते सोलापूरमध्ये आयोजित पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आता पुन्हा एकदा धक्का बसणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

राजकुमार हिवरकर यांच्यापूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी देखील असाच दावा केला आहे. ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झाल्याचं काही दिवसांपूर्वीच मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं. तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि नगरसेवक देखील आमच्या संर्पकात असल्याचा दावा रामदास कदम यांनी केला होता.

 

 

Follow Us