महायुतीत मला गाफील ठेवण्यात आलं, आमदार चंद्रकांत पाटील यांनी डागली तोफ…

आमदारांच्या नाराजीबाबत ज्याला दखल घ्यायची आहे. तो घेईल आणि ज्याला नाही घ्यायची तो नाही घेणार. मला शिवसेनेकडून आणि कोणाकडूनही काही आशा राहिलेली नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

महायुतीत मला गाफील ठेवण्यात आलं, आमदार चंद्रकांत पाटील यांनी डागली तोफ...
Shiv Sena MLA Chandrakant Patil (1)
| Updated on: Nov 25, 2026 | 8:50 PM

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीतच दोन आमदारात वाद सुरु झाले आहेत. या वादात आता मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे तरी दोन्ही आमदार बधलेले नाहीत हे विशेष. शिवसेनेची मुक्ताईनगराची एकही जागा न मिळाल्याने खंत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. सर्व आमदारांना एक- एक जागा देण्यात आली, मला न दिल्याने माझ्या मनात खंत आहे..दुःख आहे असेही आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार नाराज

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेची मुक्ताईनगरची एकही जागा न मिळाल्याने या आमदाराने खंत व्यक्त केली आहे. सर्व आमदारांना एक एक जागा देण्यात आली, मला न दिल्याने माझ्या मनात खंत आहे दुःख आहे असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यांनी एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेबाबत आणि नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मी ज्याच्या विरोधात लढतो ते लोक त्यांच्यासोबत संबंध चांगले ठेवतात. शिवसेनेकडून आता मला पुन्हा मदत होईल याची अपेक्षा राहिलेली नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

Loading...

सत्ता ज्याच्या हातात आहे, त्याला ही जागा मिळाली, माझ्या पदरी ही जागा पडली नाही. मला शिवसेनेची एक तरी जागा मिळावी ही माझी अपेक्षा होती. महायुतीत मला गाफील ठेवण्यात आलं आणि जागा दिली नाही. महायुतीत शिवसेनेच्या प्रत्येक आमदारांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रत्येकी एक ते दोन जागा देण्यात आल्या आहेत. मात्र, मला एकही जागा न मिळाल्याने मी नाराज असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
मुक्ताईनगरची जागा शिवसेनेला न मिळता रक्षा खडसेंना (भाजपा ) मिळाल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.जागा न मिळाल्याने संशोधन करण्याचा हा विषय माझ्यासाठी आहे.मुक्ताईनगरची जागा ही भाजपाला दिली जात असेल तर बोदवडची तरी जागा मला द्या ही मागणी मी केली होती. नेत्यांच्या पुढे जाता येत नाही, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. माझी आता मुख्यमंत्र्यांना आणि माझ्या नेत्यांना भेटण्याची मुळीच इच्छा नाही. माझ्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मला मदत होईल अशी देखील मला अपेक्षा नाही. कुणाजवळ दुःख मांडायचं आणि रडत जायचं हे काम माझं राहिलेलं नाही, यापुढेही अपक्ष लढू असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us