
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे, येत्या 2 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे, दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष जोमानं तयारीला लागले आहेत, काही ठिकाणी युती आघाडी होण्याचं चिन्ह आहे तर काही ठिकाणी सर्वच पक्ष निवडणुका स्वबळावर लढू शकतता असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र या निवडणुकीपूर्वी आता पक्षांतराला वेग आला आहे. अनेक इच्छुक उमेदवार या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश पार पडला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धुळे ,पुणे ,नंदुरबार सह विविध जिल्ह्यातील आणि विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, मात्र यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या पदाधिकाऱ्यांसोबतच मुंबईतील विक्रोळी, चेंबूर, कांजूरमार्ग, भागातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले पदाधिकारी
१) डॉ संजय लारने पाटील – ठाकरे गट धुळे सचिव/प्रवक्ता
२) जीतेंद्र जगताप – ठाकरे गट नगरसेवक-धुळे
३) हेमंत पाटील – माजी गटनेते ठाकरे गट शिरपूर नप, धुळे
४) वसंत पावरा – मा. सभापती जिल्हा परिषद, ठाकरे गट
५) राजेंद्र गिरास – मा नगरसेवक – शिरपूर नप.
६) हेमहराज राजपूत शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट
७) राजेश फड – मा. जिप सदस्य- परभणी
८) प्रथमेश चव्हाण – मनसे माथाडी उपाध्यक्ष
९) गोपीनाथ संसारे
१०) विनोद जगताप- ठाकरे गट, शहर संघटक – धुळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.