मोठी बातमी! उद्धव ठाकरे गटाचा बडा नेता, शिंदेंच्या शिलेदाराच्या भेटीला, 15 मिनिटं चर्चा, एकत्र येण्याबाबत मोठं विधान
राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज उपसभापती सचिन अहीर यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा झाली आहे.

राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज उपसभापती सचिन अहीर यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा झाली आहे. दरम्यान या भेटीनंतर आता अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. दिवाळीनिमित्त शुभेच्छा देतोच पण एकत्र येणार नाही, असं मोठं विधान देखील यावेळी अंबादास दानवे यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली होती. 9 पैकी सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला होता. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता. दरम्यान त्यानंतर सचिन अहीर यांनी देखील शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
दरम्यान आता अंबादास दानवे यांनी सचिन अहीर यांची भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा झाली. या भेटीवर प्रतिक्रिया देताना दिवाळीनिमित्त भेट असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. दिवाळीनिमित्त शुभेच्छा देतोच पण एकत्र येणार नाही, असंही यावेळी दानवे म्हणाले आहेत. दरम्यान यावेळी बोलताना अंबादास दानवे यांनी विविध विषयांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर देखील दानवे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. दोन्ही एनसीपीचं विलिनिकरण होणार नाही. केवळ चर्चा सुरू आहे. भाजपचा खासदारांवर डोळा आहे, ही सत्य परिस्थिती आहे, असं यावेळी दानवे यांनी म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीकडून अर्थ मंत्रालयाची मागणी होत आहे, यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा होते, म्हणून अर्थखात होतं, इतरांना ते सांभाळता येत नाही, असं दानवे यांनी म्हटलं आहे. अजितदादांच्या पक्षात दोन गट पडले का? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यता आला, यावर उत्तर देताना त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना जोरदार टोला लगावला आहे, प्रफुल्ल पटेल यांना काय महत्त्व? त्यामुळे पक्षात दोन गट पडले असं कसं बोलता येईल असं दानवे यांनी म्हटलं आहे.