उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीचं टेन्शन वाढलं, मुंबईतून मोठी बातमी

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीचं टेन्शन वाढलं, मुंबईतून मोठी बातमी
उद्धव ठाकरे
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 19, 2025 | 3:17 PM

महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगानं महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुदत संपून देखील अनेक वर्ष महापालिका निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे आता या निवडणुकांबाबत प्रचंड उत्सकता निर्माण झाली आहे. या निवडणुका सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या असणार आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीमध्ये ही निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवर गट, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती होणार आहे.  जर या महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला आपल्या कोट्यातून जागा देण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाकडून दर्शवण्यात आली आहे.  तर दुसरीकडे  यावेळी प्रथमच शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या निमित्तानं मुंबई महापालिका निवडणुकीत एक नवा प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे अडली असल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जोपर्यंत जागावाटप होत नाही, तोपर्यंत युतीची घोषणा नको अशी मनसेची भूमिका आहे. 9 जागा अशा आहेत, त्याचा तिढा अजूनही सुटलेला नाही, या 9 जागांचा तिढा सुटताच मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या यासाठी दोन्ही पक्षांमधील नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये यावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान जर मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आल्यास महायुतीचं शिवसेना शिंदे गट आणि भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.