Abhijeet Dipke: तुम्ही सर्व मुलींचे क्रश… अभिजीत दीपकेंसमोर ‘ती’ मनातलं बोलून गेली अन् थेट..Video Viral
Abhijeet Dipke Video: अभिजीत दिपके यांचा एक व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे. तरुणीने भर आंदोलनात दिपके यांना जे म्हटलं ते ऐकल्यानंतर त्यांची रिएक्शन भारी होती.

मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केले. शेकडो विद्यार्थी या आंदोलनात सामील झाले होते. वॉटचोरी प्रकरणात अभिजीत दिपके याने आंदोलन केले होते. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामासाठी हे आंदोलन केले होते.
मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये परवानगीशिवाय एकत्र जमल्याबद्दल, घोषणाबाजी केल्याबद्दल आणि घोषणाबाजी केल्याबद्दल कॉकरोच जनता पक्षाच्या समर्थकांविरुद्ध शनिवारी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी अंदाजे ४०० ते ५०० अज्ञात समर्थक आणि आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सीजेपीचे सदस्य अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आशुतोष रांका, अभिजीत दीपके, सौरभ दास, आफरीन नवाज, सौम्या कोर्डे, अंकित भारद्वाज, विजय मलंगी आणि योगेश इंगळे यांचा समावेश होता. ते दादर पश्चिम येथील मीनाताई ठाकरे स्मारकासमोरील शिवाजी पार्क मैदानाच्या गेट क्रमांक ६ वर परवानगीशिवाय जमले होते. दरम्यान, अभिजीत दीपकेने मुंबई पोलिसांच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना इन्स्टाग्रामवर पोस्ट केली की, “आणखी गुन्हे दाखल करा, पण आम्ही आमची लोकशाही वाचवण्यासाठी लढत राहू!”
View this post on Instagram
आता या दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक मुलगी मंचावर चढून बोलताना तिचे एअरफोन्स काढते आणि अभिजीत दिपके यांच्या हातात देते. अभिजीत दिपके ही हात पुढे करतात आणि घेतात. ती म्हणते मी एक डॉक्टर आहे, आणि याआधीही मी एका कार्यक्रमात सरांनी भेटली होती, त्यांना कदाचित आठवत नसेल पण मला चांगलेच आठवत आहे कारण ते मुलींचे क्रश आहे.” असं म्हणताच शिट्या आणि ताळ्या वाजू लागल्या. अभिजीत दिपकेही लाजले. समर्थक जोर जोरात ओरडू लागले. याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अभिजीत दिपके यांच्या शिवाजी पार्कमधील आंदोलनाला अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दर्शवला होता. अनेक सेलिब्रिटी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले होते. शबाना आझमी, विशाल ददलानी आणि नसरुद्दीन शाह यांनी या आंदोलनाला हजेरी लावली होती.
