
मुंबईतील दादर भागातील छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे शहरवासीयांसाठी एक आवडते आणि जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. येथे सकाळी व्यायाम करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांपासून ते संध्याकाळी विश्रांती घेणाऱ्या नोकरदारांपर्यंत विविध वयोगटातील लोकांची गर्दी असते. विशेषतः तरुणाईसाठी हे मैदान खेळण्याचे आणि मनोरंजनाचे प्रमुख केंद्र आहे, जिथे क्रिकेटसह इतर खेळांच्या सरावासाठी नेहमीच उत्साह दिसतो. सणाच्या दिवशी तर शिवाजी पार्कमध्ये तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. मात्र, या लोकप्रिय ठिकाणी नुकताच एका व्यक्तीने अश्लील आणि अस्वच्छ कृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायर झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
या पार्कमध्ये क्रिकेटच्या अनेक पिचेस असून, स्थानिक खेळाडू आणि चाहते येथे नियमितपणे येतात. चालण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठीही हे ठिकाण आदर्श आहे. शिवाय, हे मैदान राजकीय सभांचे आणि मोठ्या कार्यक्रमांचे साक्षीदार राहिले आहे, जिथे विविध पक्षांच्या नेत्यांची स्पर्धा असते. अशा ऐतिहासिक आणि सार्वजनिक महत्त्वाच्या जागी अशी अप्रिय घटना घडणे ही खरोखरच दुर्दैवी बाब असल्याचे अनेक मुंबईकर सांगत आहेत.
वाचा: त्या अपघातानंतर जुळलं सूत! कुठे भेटले प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराजे? वाचा फिल्मी लव्हस्टोरी
आता नेमके काय घडले?
दुपारच्या उजेडात एक व्यक्ती मैदानाच्या बाजूला उघड्यावर लघुशंका करताना दिसला. इतकेच नव्हे, तर या व्हिडीओमध्ये एक युवती जवळच बसलेली दिसते, पण त्या व्यक्तीला त्याचेही भान राहिले नाही. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे अस्वच्छ आणि अयोग्य वर्तन केल्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ ‘shivajipark_’ नावाच्या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले, “हे निर्लज्जते हद्दच आहे, काय करत आहात याचेही भान राहिले पाहिजे.” दुसऱ्या एकाने म्हटले, “अशा घटना वारंवार घडतात… आमच्या शिवाजी पार्कमध्ये कधीकधी मी स्वतः अशा लोकांना धडा शिकवला आहे. पण हे पार्क फक्त मोठ्या कार्यक्रमांसाठी, शिवजयंतीसाठी किंवा पोलिसांच्या परेडसाठीच स्वच्छ आणि सुरक्षित राहते. इतर वेळी दारूच्या बाटल्या, सिगरेट ओढणारे आणि अयोग्य गोष्टी करणारे लोक दिसतात. आम्ही जेवढे शक्य तेवढे साफसूफ करतो, पण यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे का?” आणखी एकाने म्हटले, “कमीत कमी लाज तरी बाळगा! दोन मिनिटांवर टॉयलेट आहे आणि बाजूला मुलगी बसली आहे. अशांना चांगला धडा शिकवायला हवा.” अशा प्रकारने सोशल मीडियावरील व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.