शिवराज सिंह चौहानांच्या नववर्षाची सुरुवात साई दर्शनाने; कोरोना संकट टळण्यासाठी केली प्रार्थना

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या नववर्षाची सुरुवात शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेऊन केली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिवराजसिंह हे शिर्डीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले.

शिवराज सिंह चौहानांच्या नववर्षाची सुरुवात साई दर्शनाने; कोरोना संकट टळण्यासाठी केली प्रार्थना
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 7:23 AM

अहमदनगर : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या नववर्षाची सुरुवात शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेऊन केली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिवराजसिंह हे शिर्डीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. माझी साईबाबांवर नितांत श्रद्धा आहे. मी दरवर्षी शिर्डीला बाबांच्या दर्शनला येत असतो. साईबाबांच्या आर्शीर्वादाने मला सदमार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते असे यावेळी शिवराजसिंह यांनी म्हटले आहे. दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

दरवर्षी दर्शनासाठी शिर्डीला येतात शिवराज सिंह

पुढे बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, आज मी साईबाबांचे दर्शन घेतले, राज्यावरील कोरोनाचे संकट टळावे, नवे वर्ष सर्वांना सुखसमाधाने जावे अशी प्रार्थना आपण साईचरणी केल्याचे ते यावेळी म्हणाले. मी दरवर्षी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डिला येत असतो. साईबाबांच्या दर्शनाने मला प्रेरणात मिळते, एक सकारात्मक उर्जा निर्माण होते. त्यांचा दर्शनाने वर्षाची सुरुवात व्हावी अशी माझी इच्छा असते असे देखील यावेळी चौहान यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींचे कौतुक

दरम्यान यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील कौतुक केले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत मोहीम हाती घेतली आहे. भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे त्यांचे स्वन्प आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्थरावर प्रयत्न होत आहेत. त्याच धर्तीवर मी राज्यात मोहीम सुरू केल्याचे ते यावेळी म्हणाले. मध्यप्रदेशचा विकास होतोय, लवकरच मध्यप्रदेश इतर राज्यांसाठी रोडमॅप होईल, मात्र त्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

 

संबंधित बातम्या

Silicon: ऊस उत्पादन वाढीसाठी सिलिकॉनचे महत्व, काय आहे कृषी विद्यापीठाचा सल्ला ?

Mata Vaishno Devi Stampede | जम्मूमधील माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

Rules For Bullock cart Race: औरंगाबाद जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीसाठी पहिला अर्ज, वाचा आणखी नियम व अटी