Shivsena : फक्त विधिमंडळ पक्षातच फूट पडली का? ठाकरेंच्या युक्तिवादाची शिंदेंच्या वकिलांकडून चिरफाड, कोर्टापुढे सगळा इतिहास मांडला, काय काय सांगितलं?

क्षात फूड पडली याचा विचार करताना संपूर्ण राजकीय पक्षाचा विचार केला पाहिजे आणि आमचे म्हणणेही तेच आहे. पक्षात पक्षांतर्गत लोकशाही असणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता. सत्ता मिळवण्यासाठी वैचारिकदृष्ट्या विरोधी व भ्रष्ट पक्षांशी युती केल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपमानजनक प्रश्नांना सामोर जावे लागत होते, असा युक्तिवाद कौल यांनी केला.

Shivsena : फक्त विधिमंडळ पक्षातच फूट पडली का? ठाकरेंच्या युक्तिवादाची शिंदेंच्या वकिलांकडून चिरफाड, कोर्टापुढे सगळा इतिहास मांडला, काय काय सांगितलं?
shivsena supreme court
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 15, 2026 | 4:40 PM

Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष आणि या पक्षाचे निवडणूक चिन्ह नेमके कोणाचे याबाबतचा खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ठाकरे गटाने आपला युक्तिवाद पूर्ण केलाय. आता शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद केला जातोय.  शिंदे गटाने नीरज कौल या निष्णात वकिलाकडे बाजू मांडण्याची जबाबदारी सोपवली आहे. ठाकरे गटाने युक्तिवाद करताना फक्त विधिमंडळ पक्षात फूट पडली होती. बाकीचा राजकीय पक्ष शाबूतच होता, असा दावा केला होता. आता याच दाव्यावर नीरज कौल यांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला आहे. त्यांनी ठाकरे गटाचे मत हे पूर्णपणे चुकीचे आहे, असं सांगितलंय. तसेच हा युक्तिवाद करताना पक्षात नेमकं काय घडत होतं, फक्त विधिमंडळ पक्षच नव्हे तर पूर्ण पक्षात थेट दोन गट तयार झाले, असं कौल आपल्या युक्तिवादात म्हणाले.

ठाकरे गटाने नेमका काय दावा केला होता?

ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली होती. युक्तिवाद करताना त्यांनी शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षात फूट पडली होती. शिवसेना पक्ष शाबूत आहे. शिवसेना पक्षातील स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी हे ठाकरे यांच्यासोबतच आहेत, असे सिब्बल न्यायालयापुढे म्हणाले होते. तसेच निवडणूक आयोगाने घाईत निर्णय घेतला, असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला होता. आता हाच मुद्दा शिंदे गटाच्या वकिलांनी खोडून काढला आहे. आम्ही फक्त विधिमंडळ पक्षात फूट पडल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगाकडे गेलो हे म्हणणं चुकीच आहे. आमचं म्हणणे तसे कधीच नव्हते. आधीच्या सर्व घटनांवरून हे दिसून येत की विधिमंडळ पक्षातील फुटीच्या पलीकडे जाऊन या सर्व बाबींचा विचार करण गरजेचं आहे, असा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला.

सत्ता मिळवण्यासाठी वैचारिकदृष्ट्या विरोधी…

तसेच, पक्षात फूड पडली याचा विचार करताना संपूर्ण राजकीय पक्षाचा विचार केला पाहिजे आणि आमचे म्हणणेही तेच आहे. पक्षात पक्षांतर्गत लोकशाही असणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता. सत्ता मिळवण्यासाठी वैचारिकदृष्ट्या विरोधी व भ्रष्ट पक्षांशी युती केल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपमानजनक प्रश्नांना सामोर जावे लागत होते, असेही यावेळी कौल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता नेमकं काय होणार, सर्वोच्च न्यायालय या युक्तिवादाकडे कसे पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us