आधी म्हणाले मांसाहार करा, आता थेट चिकन बिर्याणी आणि उकडलेली अंडी वाटली, आमदार संजय गायकवाडांनी करुन दाखवलं

मांसाहार करा म्हणणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांनी कोव्हिड रुग्णांना चिकन बिर्याणी आणि अंड्यांचे वाटप केले. Sanjay Gaikwad Chicken Biryani

आधी म्हणाले मांसाहार करा, आता थेट चिकन बिर्याणी आणि उकडलेली अंडी वाटली, आमदार संजय गायकवाडांनी करुन दाखवलं
संजय गायकवाड यांच्याकडून चिकन बिर्याणी वाटप
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 7:14 PM

बुलडाणा: मांसाहार करा म्हणणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांनी कोव्हिड रुग्णांना चिकन बिर्याणी आणि अंड्यांचे वाटप केले. रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मांसाहार करण्याचा डायट प्लॅन असल्याचं संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलं. (Shivsena Buldana mla Sanjay Gaikwad distributed Chicken Biryani and boiled egg to corona patients)

बुलडाण्यातील स्त्री रुग्णालयात बिर्याणी वाटप

नागरिकांनी रोग प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मांसाहार सेवन करावा, असं बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले होते. गायकवाड यांनी आज स्त्री रुग्णालयातील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चिकन-बिर्याणी तसेच उकडलेल्या बॉईल अंड्यांच्या आहाराचे वाटप केले.

बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सर्व सरकारी कोविड रुग्णालय त्याचबरोबर खाजगी कोविड रुग्णालयांमध्ये मोठ्या संखंने कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाच्या महामारीतून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी किमान एक दिवस आड अंडे, मटण, चिकन हे आपल्या आहारात घ्यावे आणि आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवावी, असे आवाहन शासनाने केले. यासोबत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा चार दिवसांपूर्वी मांसाहार करण्याचं आवाहन केले होते. त्यामुळे मोठे वादळ ही निर्माण झाले होते. मात्र, त्यावर पडदा पडल्याचे जाहीर करत आज पुन्हा गायकवाड यांनी कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चिकन बिर्याणी तसेच बॉईल अंड्यांचे वाटप केले. त्यामुळे पुन्हा आता वाद वाढतो की शमतो हे पहावे लागेल.

संजय गायकवाड यांची दिलगिरी

मांसाहार खा म्हणणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या वक्तव्यावरुन ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांत्या प्रती दिलगिरी व्यक्त केली. ज्यांची मन दुखावली अशा व्यक्तींची दिलगिरी केली आहे. मात्र, ज्यांनी या विषयाचं राजकारण केले त्यांची माफी मागणार नाही, असं संजय गायकवाड म्हणाले.

संबंधित बातम्या:

पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का? संजय गायकवाड यांचा वारकऱ्यांना सवाल

Audio: जगला तर धर्म नाही तर गेला गधीच्याxxx, फोन करणाऱ्या महाराजाला सेना आमदारानं झापलं

(Shivsena Buldana mla Sanjay Gaikwad distributed Chicken Biryani and boiled egg to corona patients)

Non Stop LIVE Update
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.