खासदार दिलदार, लेकीन चमचों से लोग परेशान, मातब्बर शिवसेना नगरसेवकाच्या बॅनरमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त झळकलेल्या बॅनरने कल्याणमधील शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे (ShivSena Corporater put baner on road on MP Shrikant Shinde birthday)

खासदार दिलदार, लेकीन  चमचों से लोग परेशान, मातब्बर शिवसेना नगरसेवकाच्या बॅनरमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 10:22 PM

कल्याण (ठाणे) : डोंबिवलीतील मनसेला शिवसेनेने खिंडार पाडले ही घटना ताजी आहे. मात्र कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त झळकलेल्या बॅनरने कल्याणमधील शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ‘खासदार दिलदार है, मगर चमचो से लोग परेशान’, असा मजूकर या बॅनरमध्ये आहे. केडीएमसीचे मातब्बर शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी हा बॅनर लावला आहे (ShivSena Corporater put baner on road on MP Shrikant Shinde birthday).

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक तोंडावर असताना दोन दिवसापूर्वी कल्याण लोकसभेचे खासदार शिंदे यांनी डोंबिवलीतील मनसेला खिंडार पाडून त्यांचा मोहरा राजेश कदम याला शिवसेनेत घेतले. तसेच त्याच्या दुसरी दिवशी केडीएमसीचे मनसेचे माजी विरोधी पक्षनेता मंदार हळबे यांनी भाजपत प्रवेश केला. या राजकीय घडामोडी ताज्या असताना खासदारांच्या वाढदिवसाच्या बॅनरवरुन राजकारण तापले आहे. उद्या 4 फेब्रुवारी रोजी खासदार शिंदे यांचा वाढदिवस आहे. या निमित्त कल्याण पूर्वेतील नेतीवलीतील मातब्बर नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी खासदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक बॅनर लावला आहे.

या बॅनरवर त्यांनी जो मजकूर लिहला आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. खासदारांसोबत काही मोजकेच नगरसेवकांच्या अवतीभोवती असतात. शेट्टी यांनी नक्की कोणावर निशाणा साधला आहे, कल्याण पूर्वेतील की डोंबिवलीतील नगरसेवक आहे? हे स्पष्ट म्हटलेले नाही. मात्र दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना आपलेसे करणारी शिवसेना त्यांच्या पक्षातील अंतर्गत वादापासून अनभिज्ञ आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला झळकलेला हा बॅनर राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.

कल्याणच्या नेतीवली चौकात हा बॅनर लावण्यात आला आहे. नेतीवली चौकात मल्लेश शेट्टी यांचं ऑफिस आहे. विशेष म्हणजे या नेतीवली नाक्यावर मुंबई, नाशिक आणि पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या हजारो गाड्यांची रोजची वर्दळ असते. मुख्य चौक परिसरातच बॅनर असल्याने आतापर्यंत कित्येक लोकांनी हा बॅनर वाचला असेल. अनेकजणांनी या बॅनरचे उत्साहात फोटोही काढले आहेत. याशिवाय अनेकजण आताही काढत आहे. सोशल मीडियावर आता या बॅनरचा फोटो फिरायला लागला आहे (ShivSena Corporater put baner on road on MP Shrikant Shinde birthday).

हेही वाचा : उल्हासनगरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.