शरद पवार यांच्या ‘त्या’ विधानावरून शिवसेनेने जयंत पाटील यांना कोंडीत पकडलं

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पक्ष फुतीबाबत पत्र दिले आहे. त्याच पत्रावरून शिवसेना नेत्याने ज्यत पाटील यांना एक सवाल केला आहे. शिवसेना आमदाराच्या त्या प्रश्नामुळे ज्यत पाटील यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

शरद पवार यांच्या त्या विधानावरून शिवसेनेने जयंत पाटील यांना कोंडीत पकडलं
SHARAD PAWAR AND JAYANT PATIL
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Aug 26, 2023 | 2:07 PM

छत्रपती संभाजीनगर : 26 ऑगस्ट 2024 | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये फुट पडली नाही. आमच्यातील काही जणांनी वेगळी भूमिका घेली आहे. काही आमदार गेले म्हणजे पक्ष फुटला असे होत नाही. काही आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे, असेही त्यांनी ठणकावून सांगितलं. राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष कोण असा प्रश्न त्यांना विचारल्यावर ते शरद पवार हेच उत्तर देतात असेही ते म्हणाले. मात्र, शरद पवार यांच्या या भूमिकेवरून शिवसेना नेत्याने जयंत पाटील यांची कोंडी केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी कालच्या स्टेटमेंटमध्ये असे सांगितले की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. पण, ज्याप्रमाणे शरद पवार स्टेटमेंट बदलतात त्याचप्रमाणे संजय राऊतही स्टेटमेंट बदलतात. संजय राऊत यांना माहित आहे की आता महाविकास आघाडीत फूट पडली आहे. आता महाविकास आघाडी राहणार नाही. संजय राऊत म्हणत असतील की शरद पवार हे गनिमीकाव्याने लढत आहेत तर त्यांनी पवार यांना जाऊन पेढे खाऊ घालावे. शरद पवार यांच्या शौर्याची तारीफ केली पाहिजे, असा टोला शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी लगावला.

महाविकास आघाडीत गैरसमज

संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असेही म्हणतात आणि तिकडे गनिमी कावा असेही म्हणतात ही त्यांची भूमिका गांडुळासारखी आहे. राष्ट्रवादीचा एक गट युतीमध्ये आल्यानंतर ही फूट झालेलीच आहे. त्याला सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा छुपा पाठिंबा दिसतो असे संकेत आहेत. काँग्रेस आणि उबाठा गट ही संभ्रमावस्था मानत आहे. शरद पवार यांच्यामुळे गैरसमज हे लोकांमध्ये होत नाहीत तर महाविकास आघाडीत गैरसमज होत आहेत, असे ते म्हणाले.

ते बाहेर निघत असतील तर ठीक आहे. पण…

उद्धव ठाकरे सभेनिमित्त बाहेर निघत आहेत ही चांगली गोष्ट आहे. सभेच्या माध्यमातून का होईना पण कार्यकर्त्यांशी संवाद साधला जातो. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी बाहेर निघत असतील तर ठीक आहे. परंतु, या सभेमधून फार काही निष्पन्न होईल असे काही नाही, असे शिरसाट यांनी सांगितले

जयंत पाटील यांची कोंडी

शरद पवार इतक्या लवकर त्यांचे पत्ते ओपन करतील हे समजण्याचे कारण नाही. शरद पवार यांची खेळी जेव्हा समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना पक्ष फुटीबाबत पत्र दिले आहे. पण, शरद पवार म्हणतात पक्ष फुटला नाही. असे असेल तर अध्यक्ष नार्वेकर यांना ज्यांनी पत्र दिले त्यांनी त्या पत्राबाबत पुष्टी करावी, असे सांगत जयंत पाटील यांची कोंडी केली.