AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्याकडे मर्यादित लोक, ‘त्या’ गटाकडे फार लक्ष…, शिवसेना मंत्र्यानी ‘ती’ शक्यता फेटाळून लावली

उद्धव ठाकरे यांच्यावर आम्ही काय बोलायचं, निवडणुक आयोगाने आम्हाला पक्ष आणि चिन्ह दिले आहे. त्यांच्यासोबत ही काही लोक उरली आहेत त्यांना उद्धव ठाकरे स्वतः जायचं असेल तर जा असे सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या सोबत असणारेही विचलत होत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्याकडे मर्यादित लोक, 'त्या' गटाकडे फार लक्ष..., शिवसेना मंत्र्यानी 'ती' शक्यता फेटाळून लावली
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Aug 24, 2023 | 4:20 PM
Share

मुंबई : 24 ऑगस्ट 2023 | एकनाथ शिंदे यांच्या गटातील 16 आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी तब्बल सहा हजार पानी उत्तर पाठवलं आहे. आमचाच पक्ष योग्य असून आम्ही उत्तर दिलयं. त्यावर आम्हाला समक्ष युक्तीवाद करायलाही आवडेल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

उद्धव साहेब त्यावेळी म्हटले होते कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही. पण त्यांनी युती केली. त्यांनी पक्ष त्यांच्या दावणीला बांधला होता. म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झालो. त्यांच्या दावणीतून पक्ष बाहेर काढला. आम्ही कुठलही पाप केलं नाही. उलट आम्ही पुण्य केलं. बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत. पण, हे त्यांना पाप वाटत आहे का? असा सवाल त्यांनी केला.

कांदा प्रश्नाबाबत तोडगा निघेल

कांद्याप्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राज्याची विनंती मान्य करून केंद्राने कांदा विक्रीचा निर्णय घेतला. त्यामुळे काही ठिकाणी कांदा खरेदी सुरू झाली. तर काही ठिकाणी नाही. याबाबत केंद्रीय मंत्री भारतीताई पवार या सर्वांच्या संपर्कात आहेत. त्यावर लवकरच तोडगा निघेल. अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना मदत करण्याबाबत सरकारमध्ये कोण कोणाची कोंडी करत नाही. जे नियमात असेल ते केले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या पिक कर्जाबाबत या मंत्र्यासोबत बोलणार

राज्यातील काही भागात पाऊस लांबला. त्यामुळे पीकांचे नुकसान झाले. राज्यातील धरणातील पाण्याचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी काही सूचना दिल्या आहेत. शेतीचे पाणी आणि पिण्याचे पाणी याचे नियोजन करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे तरीही काही बँका त्याच्याकडे कर्ज फेडीसाठी तगादा लावत असतील तर त्याबाबत सरकारी बॅकाबाबत सहकार मंत्री यांच्याशी बोलणार आहे. तसेच, राष्ट्रीय बॅकाच्या संदर्भात अर्थमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या दुसऱ्या गटाकडे लक्ष नाही…

राष्ट्रवादीचा एक गट म्हणजेच अजित दादा आमच्यासोबत आहेत. त्यांनी उघड भूमिका घेतली आहे. विकासासोबत काम करण्याची त्यांची इच्छा आहे. अजित दादा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत आणि तो पक्षच आमच्यासोबत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही, असा टोला त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?