AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | भुंकणारा कुत्रा कधी चावत नाही, शिंदे गटातल्या नेत्याची शिवसेना नेत्यावर जहरी टीका

Video | भुंकणारा कुत्रा कधी चावत नाही, शिंदे गटातल्या नेत्याची शिवसेना नेत्यावर जहरी टीका

| Updated on: Sep 20, 2022 | 10:47 AM
Share

भास्कर जाधवचा मेंदू सडलेला आहे. त्यातून तसेच विचार येतात. त्याचच डोकं तपासून घ्यावं लागेल. काही दिवसांनंतर तो दगडं मारेल... मी रामदास कदमावर टीका करू शकतो, हे दाखवण्याचा त्याचा बालिश प्रयत्न आहे, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं.

मनोज लेले,  रत्नागिरीः  सडलेल्या मेंदूतून सडलेले विचार बाहेर येतात. असा भुंकणारा कुत्रा भुंकत राहतो. पण हत्ती त्याची चाल सोडत नाही आणि भुंकणारा कुत्रा चावत नसतो, अशी जहरी टीका शिंदे गटातील रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनीही काल रामदास कदम यांच्यावर आगपाखड केली. दापोली येथील रामदास कदम यांच्या सभेनंतर शिवसेना (Shivsena) नेत्यांनी रामदास कदमांवर चौफेर टीका सुरु केली आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं असून हे राजकारणाला शोभणारं नाही, असा सूर सर्वत्र उमटत आहे. भास्कर जाधव यांनीही रामदास कदम यांच्या तोंडून घाण बाहेर पडली, असं वक्तव्य केलं होतं. रामदास कदम यांनी आज याला प्रत्युत्तर दिलंय. उद्धवजींनी या गद्दाराला नेता बनवला. भास्कर जाधवचा मेंदू सडलेला आहे. त्यातून तसेच विचार येतात. त्याचच डोकं तपासून घ्यावं लागेल. काही दिवसांनंतर तो दगडं मारेल… मी रामदास कदमावर टीका करू शकतो, हे दाखवण्याचा त्याचा बालिश प्रयत्न आहे, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं.

Published on: Sep 20, 2022 10:47 AM